Mumbai Municipal Corporation will raise money from the stock market

शेअर बाजाराचा(share market down) निर्देशांक आज दिवस अखेर ८७ अंशाने घसरला. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

    मुंबई. शेअर बाजाराचा(share market down) निर्देशांक आज दिवस अखेर ८७ अंशाने घसरला. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

    एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरमध्ये घसरण झाली. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ८६.९५ अंशाने घसरून ४९७७१.२९ वर तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर ७.६० अंशाने घसरून १४७३६.४० वर स्थिरावला.कोरोनाबाधितांचे देशात प्रमाण वाढत असल्याने शेअर बाजारावर नकारात्मक पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी टाळेबंदी लागू केल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढल्याचेही दिसून आले आहे. दुसरीकडे, इंडसइंड बँकेचे सर्वाधिक सुमारे ४ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. तर पॉवरग्रीड, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर घसरले.