अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेकडून आज आणि उद्या बँकाच्या सर्वव्यापी बंदची घोषणा!

केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने कामगार, शेतकरी आणि लोकांवर परिणाम करणाऱ्या सरकारी धोरणांच्या निषेधार्थ २८ आणि २९ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

    ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), (All India Bank Employee Association) बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (FIBOA) यांनी आज आणि उद्या बँकाच्या सर्वव्यापी बंदची घोषणा केली आहे. अशी माहिती भारतीय बँक संघटना (IBA) एसबीआयने दिली आहे.

    28 आणि 29 मार्च रोजी  2 दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आणि बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2021 ला विरोध करण्यासाठी 2 दिवसीय हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. गेल्या वर्षी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) अंतर्गत बँक संघटनांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs) प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात देशव्यापी संप जाहीर केला होता.

    दरम्यान, केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने कामगार, शेतकरी आणि लोकांवर परिणाम करणाऱ्या सरकारी धोरणांच्या निषेधार्थ २८ आणि २९ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. दरम्यान, कामगार संघटनांच्या 28-29 मार्च रोजी देशव्यापी बंदच्या आवाहनानंतर, पश्चिम बंगाल सरकारने शनिवारी सांगितले की त्या दिवशी सर्व कार्यालये खुली राहतील आणि कर्मचार्‍यांना ड्युटीसाठी अहवाल द्यावा लागेल.