ॲमेझॉनने सणासुदीच्या काळासाठी भारतातील १४ शहरांमध्ये ३५ स्पेशलाइझ्ड Amazon Fresh Centers सुरू करून फ्रेश संरचनेत (Fresh Structure) केली दुप्पटीने वाढ

ॲमेझॉन फ्रेश सिलेक्शनमधील लाखो क्युरेटेड वस्तूंच्या साठवणीसाठी तसेच फुलफिलमेंटसाठी सुमारे १० लाख (१ दशलक्ष) चौरस फूट डेडिकेटेड जागा आहे. उत्पादने सुरक्षितपणे साठवता येतील असा पद्धतीने या इमारतींची रचना करण्यात आली आहे आणि ग्राहकांच्या ऑर्डर्सवर अत्याधुनिक उपकरणे व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रक्रिया केली जात आहे.

  • ॲमेझॉनने आपली फ्रेश प्रक्रिया क्षमता गेल्या वर्षापासून दुप्पटीहून अधिक वाढवली आहे
  • नाशवंत पदार्थ, मुलभूत पदार्थ तसेच घरगुती उत्पादनांचा समावेश असलेले दैनंदिन किराणा सिलेक्शन आता अतिजलद डिलिव्हरीसाठी उपलब्ध

नवी दिल्ली : ॲमेझॉन इंडियाने (Amazon India) आज आपल्या ॲमेझॉन फ्रेश (Amazon Fresh) या दैनंदिन गरजेच्या वस्तू व किराणा माल (Daily necessities and groceries) अतिजलद म्हणजेच २ तासांत डिलिव्हर करणाऱ्या ॲमेझॉन फ्रेश या विभागाच्या विशेषीकृत संरचना (Structure) नेटवर्कमध्ये लक्षणीय विस्ताराची घोषणा (Announcement of expansion) केली.

या विस्तारामुळे (expansion) कंपनीने आपली प्रक्रिया क्षमता गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक वाढवली आहे आणि आता नवी दिल्ली, गुडगाव, नोएडा, मुंबई, ठाणे, वाशी, अहमदाबाद, जयपूर, पुणे, बेंगलोर, म्हैसूर, चेन्नई, हैदराबाद व कोलकाता या भारतातील १४ शहरांमध्ये ॲमेझॉन फ्रेशची ३५ डेडिकेटेड केंद्रे आहेत.

ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण करणाऱ्या अन्य प्रकारांतील इमारतींच्या संरचनेचाही कंपनीने विस्तार केला आहे. त्यातून स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे आणि त्यासाठी नियुक्तीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे.

या विस्तारामुळे कंपनीकडे आता ॲमेझॉन फ्रेश सिलेक्शनमधील लाखो क्युरेटेड वस्तूंच्या साठवणीसाठी तसेच फुलफिलमेंटसाठी सुमारे १० लाख (१ दशलक्ष) चौरस फूट डेडिकेटेड जागा आहे. उत्पादने सुरक्षितपणे साठवता येतील असा पद्धतीने या इमारतींची रचना करण्यात आली आहे आणि ग्राहकांच्या ऑर्डर्सवर अत्याधुनिक उपकरणे व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रक्रिया केली जात आहे. यामध्ये कोरडा किराणा माल, फळे व भाज्यांसाठी स्वतंत्र साठवण संरचना तसेच थंड व फ्रोजन वस्तूंसाठी खास तापमान नियंत्रणाची सुविधा असलेल्या खोल्या प्रत्येक विभागाकरता तयार करण्यात आल्या आहेत. फ्रोजन तसेच थंड वस्तूंची डिलिव्हरी दुर्गम भागात करण्यासाठी कंपनीकडे इंटिग्रेटेड जेल पॅड फ्रीजर्सही आहेत.

“आमचे ग्राहक त्यांच्या दैनंदिन आवश्यकतांच्या जलद व सुरक्षित डिलिव्हरीजसाठी आमच्यावर विश्वास ठेवतात. ॲमेझॉन फ्रेशसाठी विशेषीकृत नेटवर्कचा विस्तार केल्यामुळे आम्हाला देशातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. संरचनेतील या गुंतवणुकीमुळे, आम्ही ज्या १४ शहरांमध्ये ॲमेझॉन फ्रेशची उत्पादने दररोज लक्षावधी ग्राहकांना पोहोचवतो, त्यावर प्रक्रिया करतो, तेथे रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत,” असे ॲमेझॉन इंडियाच्या फुलफिलमेंट ऑपरेशन्स व पुरवठा साखळीचे उपाध्यक्ष प्रकाश दत्ता म्हणाले.

ॲमेझॉन फ्रेशच्या सेवेमध्ये झालेल्या या वाढीमुळे ग्राहक आता फळे व भाज्या, दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस यांसारखे फ्रोजन व थंड पदार्थ, कोरडा किराणामाल, सौंदर्यप्रसाधने, बेबी प्रोडक्ट्स, पर्सनल केअरची उत्पादने, पाळीव प्राण्यांसाठीची उत्पादने यांच्या विस्तृत श्रेणीतून निवड करून खरेदी करू शकतात. या उत्पादनांची डिलिव्हरी सोयीस्कर पद्धतीने २ तासांत केली जाते. यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंतचे डिलिव्हरी स्लॉट्स असतात. ६०० रुपयांहून अधिक रकमेच्या सर्व ऑर्डर्सवर सर्व ग्राहकांना २ तासांत मोफत डिलिव्हरी दिली जाते. याहून कमी रकमेच्या ऑर्डर्सवर २९ रुपये डिलिव्हरी शुल्क लावले जाऊ शकते आणि ॲमेझॉन फ्रेश स्टोअरवर उत्पादने ऑफर करणारे विक्रेते किमान ऑर्डर मूल्याची अट लावत नाहीत. ग्राहक Amazon.in ॲप, डेस्कटॉप किंवा मोबाइल ब्राउजरवरील फ्रेश आयकनवर क्लिक करून या स्टोअरबद्दल जाणून घेऊ शकतात आणि किराणामाल खरेदीचा उत्कृष्ट अनुभव प्राप्त करू शकतात.तुम्ही हे स्टोअर बघण्यासाठी क्लिक करू शकता- here.