Amazon Reliance Deal: Mukesh Ambani's Rs 1,400 crore deal with Reliance in dispute; ED summons Amazon India chief

फ्युचर ग्रुप आणि ॲमेझॉन इंडिया यांच्यामध्ये झालेल्या डीलमध्ये अनियमितता झाल्याची सरकारला शंका आहे. यापार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात ईडीनं ॲमेझॉन इंडियाचे हेड अमित अग्रवाल यांना समन्स पाठवले आहे( Amazon Reliance Deal: Mukesh Ambani's Rs 1,400 crore deal with Reliance in dispute; ED summons Amazon India chief ). पुढील आठवड्यात चौकशीसाठी त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

    दिल्ली : फ्युचर ग्रुप आणि ॲमेझॉन इंडिया यांच्यामध्ये झालेल्या डीलमध्ये अनियमितता झाल्याची सरकारला शंका आहे. यापार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात ईडीनं ॲमेझॉन इंडियाचे हेड अमित अग्रवाल यांना समन्स पाठवले आहे( Amazon Reliance Deal: Mukesh Ambani’s Rs 1,400 crore deal with Reliance in dispute; ED summons Amazon India chief ). पुढील आठवड्यात चौकशीसाठी त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

    ॲमेझॉनने 2019 मध्ये 1400 कोटी रुपयांच्या व्यवहारात फ्युचर रिटेलमध्ये 49 टक्के भागिदारी खरेदी केली होती. या डीलमध्ये परदेशी चलनासंदर्भात भारतीय कायदे किंवा परदेशी चलन नियोजन अधिनियमाचे (फेमा) उल्लंघन झाले असल्याचा ईडीला संशय आहे. याप्रकरणी ॲमेझॉन इंडियाविरोधात फेमाबाबत या वर्षी जानेवारीमध्ये केस दाखल करण्यात आली होती.

    ॲमेझॉन आणि मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये दिल्ली हायकोर्टातील लढाईनंतर काही टिप्पणीनंतर ईडीने हे समन्स बजावले आहे. दरम्यान, ॲमेझॉन इंडियाने ईडीद्वारे बजावलेल्या समन्सला दुजोरा दिला असून दिलेल्या कालावधीत आम्ही ईडीला प्रतिसाद देऊ, असे स्पष्ट केले आहे.