
गोदरेज कंपनीचे नाव समोर आले की, सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे टाळे. विशेष म्हणजे १.७६ लाख कोटी रुपयांच्या गोदरेज कंपनीने कुलूप विकून आपला प्रवास सुरू केला.
गोदरेज कंपनीचं विभाजन : देशामधील आघाडीच्या उद्योगपतींचा विचार केला तर आपल्यासमोर सर्वात आधी नाव येतात ती म्हणजेच अंबानी, टाटा, बिर्ला, गोदरेज. गोदरेजच्या वस्तू आपण बऱ्याच वर्षांपासून आपल्या घरांमध्ये वापरत असतो. आता १२६ वर्षे जुना गोदरेज समूहाचे विभाजन होण्याची शक्यता आहे. १.७६ लाख कोटी रुपयांच्या या घरातील व्यवसायाची विभागणी करण्याची कसरत सुरू झाली आहे. काय आहे प्रकरण आणि या दिग्गज कुटुंबात कशी काय फूट पडेल, चला जाणून घेऊयात.
गोदरेज कंपनीचे नाव समोर आले की, सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे टाळे. विशेष म्हणजे १.७६ लाख कोटी रुपयांच्या गोदरेज कंपनीने कुलूप विकून आपला प्रवास सुरू केला. भारतातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेला हा ग्रुप ५ दशकांपूर्वी सुरू झाला होता. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, आता या समूहाच्या विभाजनाबाबत चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा प्रगत टप्प्यावर पोहोचली असून, लवकरच त्याची अधिकृत घोषणा होऊ शकते.
कॉर्पोरेट्सची विभागणीही विशेष असते, कारण त्या कुटुंबाबरोबरच इतर अनेकांचे भविष्यही त्यात गुंतलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या उद्योग समूहांच्या विभाजनात अनेक गुंतागुंत असते. जर तुम्हाला मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यातील फाळणी आठवत असेल तर तुम्ही हे समजू शकता. गोदरेज समूहाच्या सध्या ५ लिस्टेड कंपन्या आहेत. यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज अॅग्रोव्हेट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि लाइफसायन्स यांचा समावेश आहे. गोदरेज कुटुंबात सध्या दोन गट आहेत. गोदरेज समूहाचे प्रमुख आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर गोदरेज इंडस्ट्रीज आणि असोसिएट्सवर नियंत्रण ठेवतात. तर गोदरेज आणि बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे प्रमुख आदि गोदरेजचे चुलत भाऊ जमदेश गोदरेज आणि स्मिता कृष्णा गोदरेज आहेत. आता बातमी अशी आहे की अभियांत्रिकी, सुरक्षा, कृषी, रिअल इस्टेट आणि ग्राहक उत्पादनांच्या या विभागाचे विभाजन केले जाऊ शकते.