Bandhan Bank चा भारत सरकारसोबत सहयोग, संरक्षण दलाच्या पेन्शनर्ससाठी स्थापन करणार स्पर्श सेवा केंद्रे

बंधन बँक आपल्या ५५७ शाखांमार्फत संरक्षण खात्याच्या निवृत्तिवेतनधारकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सेवा पुरवेल. सिस्टिम फॉर पेन्शन ऍडमिनिस्ट्रेशन रक्षा (स्पर्श) वर संरक्षण खात्याच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी आउटरीच प्रोग्रामअंतर्गत त्यांच्या निवृत्तिवेतनाशी संबंधित सर्व कामे एकाच ठिकाणी पूर्ण होतील अशी सुविधा पुरवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला अनुसरून बँकेने हे पाऊल उचलले आहे.

    मुंबई : बंधन बँकेने (Bandhan Bank) भारत सरकारच्या (Government Of India) संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) संरक्षण लेखा महानियंत्रकांसोबत समझोता करार केला असल्याची घोषणा केली आहे. संरक्षण खात्याचे निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना बँकिंग सेवा (Banking Services) प्रदान करण्यासंदर्भात हा सहयोग (Collaboration) करण्यात आला असल्याची माहिती बँकेने दिली आहे.

    बंधन बँक आपल्या ५५७ शाखांमार्फत संरक्षण खात्याच्या निवृत्तिवेतनधारकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सेवा पुरवेल. सिस्टिम फॉर पेन्शन ऍडमिनिस्ट्रेशन रक्षा (स्पर्श) वर संरक्षण खात्याच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी आउटरीच प्रोग्रामअंतर्गत त्यांच्या निवृत्तिवेतनाशी संबंधित सर्व कामे एकाच ठिकाणी पूर्ण होतील अशी सुविधा पुरवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला अनुसरून बँकेने हे पाऊल उचलले आहे.

    प्रयागराजमधील भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या पीसीडीए (पेन्शन्स) कार्यालयातील कन्ट्रोलर शाम देव, आयडीएएस, भारत सरकारच्या संरक्षण सचिवालयातील गिरीधर अरमाने, आयएएस, आर्थिक सल्लागार रसिका चौबे (संरक्षण सेवा) आणि बंधन बँकेचे प्रमुख – गव्हर्नमेंट बिझनेस देबराज साहा यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे समझोता करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

    संरक्षण सचिवांनी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये स्पर्श सेवा केंद्राचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. या स्पर्श सेवा केंद्रामध्ये विविध सेवा प्रदान केल्या जात आहेत, यामध्ये सेवा विनंत्या आणि तक्रार निवारण, वार्षिक जीवन प्रमाणपत्र, पेन्शनर डेटा पडताळणी (पीडीव्ही), आधार क्रमांक, पॅन क्रमांक, पोस्टल पत्ता आणि बँक तपशीलांसह प्रोफाइलमधील बदल करवून घेणे यांचा समावेश आहे.