आर्थिक कामांचा नका होऊ देऊ खोळंबा, डिसेंबर महिन्यात ६ दिवस बँका राहणार बंद

डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात(Bank Holidays In December 2021) बँकांना ६ दिवस सुट्टी असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank Of India)बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे.

    बँकांशी संबंधित काही कामे करायची असतील तर ती वेळीच करून घ्या. कारण डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात(Bank Holidays In December 2021) बँकांना ६ दिवस सुट्टी असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank Of India)बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर करण्यात आलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही डिसेंबर महिन्यातील (List Of Bank Holidays In December 2021)बँकांच्या सुट्ट्यांची यादी देत आहोत.

    कोरोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहेत. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. तरीदेखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकांच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

    सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
    ५ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    ११ डिसेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
    १२ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    १९ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    २५ डिसेंबर – ख्रिसमस (बंगळुरू आणि भुवनेश्वर वगळता सर्व ठिकाणी बँका बंद) शनिवार, (महिन्याचा चौथा शनिवार)
    २६ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)