अरे देवा! ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…

बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात, कारण काही सण-समारंभ असे असतात की जे ठराविक राज्यातच साजरे केले जातात.

  नवी दिल्ली : Bank Holidays in October 2021 सप्टेंबर महिना संपायला अवघे तीनच दिवस शिल्लक आहेत. दरम्यान तुमची बँकेत काही कामं असतील तर ती लवकर पूर्ण करा. कारण पुढील महिन्यात नवरात्र, दसरा या सणासमारंभानिमित्त (Festive season Holiday in October) बऱ्याच काळासाठी बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात जवळपास (Bank Holidays October) २१ दिवस बँका बंद असतील.

  नेमके तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी बँकेत गेलात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे त्याआधी कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या. या बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात, कारण काही सण-समारंभ असे असतात की जे ठराविक राज्यातच साजरे केले जातात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.

  इथे तपासा सुट्ट्यांची यादी?

  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) जारी केली जाते. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासू शकता. प्रत्येत महिन्याची यादी या ठिकाणी पाहता येईल. आरबीआयच्या वेबसाइटवर ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची (Bank Holidays List October 2021) यादी तुम्हाला तपासता येईल. या २१ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. या दरम्यान काही ठिकाणी तर सलग पाच दिवस देखील बँका बंद आहेत.

  अशी आहे सुट्ट्यांची यादी

  • १ ऑक्टोबर – गंगटोकमध्ये बँक खाती अर्धवार्षिक बंद करणे
  • २ ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती (सर्व राज्ये)
  • ३ ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • ६ ऑक्टोबर – महालय अमावस्या (आगरतळा, बंगळुरू, कोलकाता)
  • ७ ऑक्टोबर – लेनिंगथौ सनमही (इम्फाळ) चे मेरा चाओरेन हौबा
  • ९ ऑक्टोबर – दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
  • १० ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • १२ ऑक्टोबर – दुर्गा पूजा (महा सप्तमी) / (आगरतळा, कोलकाता)
  • १३ ऑक्टोबर – दुर्गा पूजा (महा अष्टमी) / (आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोलकाता, पाटणा, रांची)
  • १४ ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दसरा महा नवमी/आयुथा पूजा (आगरतळा, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, शिलाँग, श्रीनगर, तिरुअनंतपुरम)
  • १५ ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दसरा/विजया दशमी/ (इम्फाळ आणि शिमला वगळता सर्व बँका)
  • १६ ऑक्टोबर – दुर्गा पूजा (दसैन) / (गंगटोक)
  • १७ ऑक्टोबर – रविवार
  • १८ ऑक्टोबर – काटी बिहू (गुवाहाटी)
  • १९ ऑक्टोबर-ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी / मिलाद-ए-शेरीफ (पैगंबर मोहम्मद यांची जयंती) / बारावफाट / (अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, कानपूर, कोची , लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर, तिरुअनंतपुरम)
  • २० ऑक्टोबर-महर्षी वाल्मिकी यांचा वाढदिवस/लक्ष्मी पूजा/ईद-ए-मिलाद (आगरतळा, बंगळुरू, चंदीगड, कोलकाता, शिमला)
  • २२ ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू, श्रीनगर) नंतर शुक्रवार
  • २३ ऑक्टोबर – चौथा शनिवार
  • २४ ऑक्टोबर – रविवार
  • २६ ऑक्टोबर – प्रवेश दिवस (जम्मू, श्रीनगर)
  • ३१ ऑक्टोबर – रविवार