बँक ऑफ बडोदा BOB तर्फे सणासुदीच्या मोसमात होम लोन आणि कार लोनची ऑफर

ही ऑफर होम लोन आणि कार लोन (Offer Home And Car Loan) उत्पादनांवर लागू असेल. जिथे बँकेकडून सर्वच शाखांतून उपलब्ध असलेल्या बडोदा होम लोन आणि कार लोनवर @0.25% ची सूट देण्यात आली आहे.

    मुंबई : बँक ऑफ बडोदा BOB ही भारताची महत्त्वपूर्ण सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून त्यांच्यातर्फे उत्सवी काळात रिटेल लोनची (Retail Loan) घोषणा करण्यात आली.

    ही ऑफर होम लोन आणि कार लोन (Offer Home And Car Loan) उत्पादनांवर लागू असेल. जिथे बँकेकडून सर्वच शाखांतून उपलब्ध असलेल्या बडोदा होम लोन आणि कार लोनवर @0.25% ची सूट देण्यात आली आहे. त्याशिवाय ही बँक होम लोनवर प्रक्रिया शुल्कातही सूट देते आहे. आता होम लोनचा दर 6.75% तर कार लोनचा दर 7.00% * पासून पुढे याप्रमाणे राहील.

    हे स्पर्धात्मक दर आणि प्रक्रिया शुल्कावरील सूट यांच्यासोबत प्रस्तावित ग्राहकांना बँक ऑफ बडोदाची निवड केल्याबद्दल नवीन घर आणि नवीन गाडीच्या (New Home And New Car) खरेदीवर अतिरिक्त सवलत मिळणार आहे. तसेच ग्राहकांना वेगवान प्रक्रिया शुल्क आणि घरपोच सेवा उपलब्ध होतील. या सुविधांच्या त्वरित मंजुरीकरिता ग्राहक “बॉब वर्ल्ड” / मोबाईल बँकिंग किंवा बँकेच्या वेबसाईटवर अर्ज करू शकतील.

    होम आणि कार लोनच्या उत्सवी ऑफरच्या लॉन्चवर, बँक ऑफ बडोदाचे जीएम- मॉर्गेज अँड अदर रिटेल असेट- एच.टी.सोलंकी म्हणाले की, “या उत्सवी काळात ही रिटेल लोन ऑफर सादर करून आमच्या सध्याच्या प्रामाणिक ग्राहकांच्या चेहऱ्यावर उत्सवी आनंद आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. बँकेसाठी नवीन असणाऱ्या ग्राहकांना देखील होम आणि कार लोनवर आकर्षक सूट उपलब्ध करून येणार आहे. ज्यामुळे त्यांना ऑफरमार्फत देण्यात येणाऱ्या प्रक्रिया शुल्कावरील सवलतीचा आणि अल्प दराचा लाभ घेणे शक्य होईल.