Big Savings on Techno Smartphones During Flipkart Big Saving Days Sale
'फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज' सेलदरम्‍यान टेक्‍नो स्‍मार्टफोन्‍सवर मिळवा मोठी बचत

टेक्‍नो पोवा ६ जीबी + १२८ जीबी वेरियंटची पदार्पणीय विक्री १८ डिसेंबरपासून सुरू झालीये. हा डिवाइस फक्‍त ११,९९९ रूपये किंमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल. ग्राहक एसबीआय कार्डसवर त्‍वरित १० टक्‍के सूटच्‍या स्‍पेशल ऑफरचा देखील लाभ घेऊ शकतात.

नवी दिल्‍ली : नाताळ सण व नववर्ष जवळच आले असताना टेक्‍नोने ते अधिक भव्‍य व संस्‍मरणीय करण्‍यासाठी १८ ते २२ डिसेंबर २०२० पर्यंत आयोजित करण्‍यात आलेल्‍या फ्लिपकार्टच्‍या आगामी ‘बिग सेव्हिंग डेज’ सेलदरम्‍यान उत्‍सवी आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहची भर घालत त्‍यांच्‍या लोकप्रिय स्‍मार्टफोन्‍सवर आकर्षक ऑफर्स व सूटची घोषणा केली आहे.

यापूर्वी, ग्राहकांनी टेक्‍नो पोवा ४ जीबी + ६४ जीबी स्‍मार्टफोनला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. ज्‍यामुळे टेक्‍नो सातत्‍याने ४.५ व त्‍यापेक्षा अधिक रेटिंगसह फ्लिपकार्टवर ‘हायेस्‍ट रेटेड स्‍मार्टफोन ब्रॅण्‍ड’ ठरला. या यशाला अधिक पुढे घेऊन जात टेक्‍नो पोवा ६ जीबी + १२८ जीबी वेरियंटची पदार्पणीय विक्री १८ डिसेंबरपासून सुरू झालीये. हा डिवाइस फक्‍त ११,९९९ रूपये किंमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल. ग्राहक एसबीआय कार्डसवर त्‍वरित १० टक्‍के सूटच्‍या स्‍पेशल ऑफरचा देखील लाभ घेऊ शकतात.

सध्‍या सर्वात स्‍पर्धात्‍मक स्‍मार्टफोन म्‍हणून टेक्‍नो पोवाकडे पाहिले जात आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये उच्‍च कार्यक्षम मीडियाटेक हेलिओ जी८० ऑक्‍टा-कोअर प्रोसेसर, इन-बिल्‍ट हायपर इंजिन गेमिंग टेक्‍नोलॉजी आणि ६००० एमएएच क्षमतेच्‍या बॅटरीसह १८ वॅट ड्युअल आयसी फास्‍ट चार्ज अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. ज्‍यामधून एकसंधी, विनाव्‍यत्‍यय गेमिंग व मल्‍टाटास्किंग अनुभव मिळतो. तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये विशाल ६.८ इंच डॉट-इन डिस्‍प्‍ले आहे, जो सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देतो.

यंदाच्‍या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्‍ये टेक्‍नो वाजवी दराच्‍या विभागातील सर्वोत्तम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍ड असल्‍याचे पाहायला मिळेल. स्‍पार्क पॉवर २ एअरमध्‍ये विभागाला परिभाषित करणारी वैशिष्‍ट्ये आहेत, जसे ६००० एमएएच क्षमतेच्‍या बॅटरीसह एआय पॉवर चार्जिंग व सेफ चार्जिंग, विशाल ६.९५ इंच डॉट-नॉच डिस्‍प्‍ले आणि १३ मेगापिकसल एआय सक्षम क्‍वॉड कॅमेरासह विभागाला परिभाषित करणारे व स्टिरिओ साऊण्‍ड असलेले स्‍पीकर्स.

या स्‍मार्टफोनची किंमत फक्त ७९९९ रूपये आहे. कॅमॉन १५ हा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांनी युक्‍त स्‍मार्टफोन आहे. या स्‍मार्टफोनची किंमत ९९९९ रूपये आहे. १०,००० रु. हून कमी विभागातील या स्‍मार्टफोनमध्‍ये ४८ मेगापिक्‍सल रिअर कॅमेरा, १६ मेगापिक्‍सल डॉट-इन सेल्‍फी कॅमेरा आहे. याव्‍यतिरिक्‍त, एसबीआय बँक क्रेडिट कार्ड युजर्स सेलरदरम्‍यान हे टेक्‍नो फोन्‍स खरेदी करताना त्‍यांच्‍या कार्ट मूल्‍यावर १० टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटचा लाभ घेऊ शकतात.

टेक्‍नो स्‍मार्टफोन्‍सची मुख्‍य वैशिष्‍ट्ये:

वैशिष्‍ट्ये टेक्‍नो पोवा

किंमत ११,९९९ रूपये

कॅमॉन १५

किंमत ९,९९९ रूपये

टेक्‍नो स्‍पार्क पॉवर २ एअर

किंमत ७,९९९ रूपये

डिस्‍प्‍ले व डिझाइन ६.८ इंची एचडी+ डॉट-इन डिस्‍प्‍ले ६.५५ इंची एचडी+ डॉट-इन डिस्‍प्‍ले ७ इंची एचडी+ डिस्‍प्‍ले
फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्‍सल एआय सेल्‍फी कॅमेरासह ड्युअल फ्रंट फ्लॅश १६ मेगापिक्‍सल डॉट-इन सेल्‍फी कॅमेरासह ड्युअल फ्रंट फ्लॅश ८ मेगापिक्‍सल एआय सेल्‍फी कॅमेरासह ड्युअल फ्रण्‍ट फ्लॅश
रिअर कॅमेरा १६ मेगापिक्‍सल + २ मेगापिक्‍सल + २ मेगापिक्‍सल + एआय लेन्‍स एआय क्‍वॉड कॅमेरासह क्‍वॉड फ्लॅश ४८ मेगापिक्‍सल एआय क्‍वॉड कॅमेरासह क्‍वॉड फ्लॅश १३ मेगापिक्‍सल + २ मेगापिक्‍सल + २ मेगापिक्‍सल + एआय लेन्‍ससह क्‍वॉड फ्लॅश
मेमरी ६ जीबी रॅम व २५६ जीबीपर्यंत विस्‍तारित करता येणारे १२८ जीबी रॉम ४ जीबी रॅम व २५६ जीबीपर्यंत विस्‍तारित करता येणारे ६४ जीबी रॉम ३ जीबी रॅम व २५६ जीबीपर्यंत विस्‍तारित करता येणारे ३२ जीबी रॉम
बॅटरी ६००० एमएएच बॅटरीसह १८ वॅट ड्युअल आयसी फ्लॅश चार्जर ५००० एमएएच बॅटरी ६००० एमएएच बॅटरी
ओएस अँड्रॉइड १० वर आधारित एचआयओएस व्‍ही ७.० अँड्रॉइड १० वर आधारित एचआयओएस ६.०.१ अँड्रॉइड १० वर आधारित एचआयओएस ६.१
प्रोसेसर हेलिओ जी८०, ऑक्‍टा-कोअर हेलिओ पी२२, ऑक्‍टा-कोअर हेलिओ ए२२ २.० गिगाहर्टझ क्‍वॉड कोअर
रंग पर्याय डॅझल ब्‍लॅक, मॅजिक ब्‍ल्‍यू आणि स्‍पीड पर्पल शोएल गोल्‍ड, फॅसिनेटिंग पर्पल, डार्क रेड आईस जेडइट, कॉस्मिक शाइन