ब्लू डार्टच्या ‘Diwali Express’अंतर्गत ग्राहकांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय भेटवस्तूंच्या शिपमेंटवर मिळणार 40% डिस्काउंट

या अंतर्गत स्थानिक व आंतरराष्ट्रीय (National and International) अशा दोन्ही प्रकारच्या शिपमेंट्सवर (Shipments) 40% डिस्काउंटचा (Discount) लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सर्व लॉजिस्टिक (Logstics) गरजांसाठी वन-स्टॉप सोल्युशन उपलब्ध होणार आहे.

  • 11 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2021 या कालावधीसाठी ही ऑफर वैध आहे

मुंबई : भारतातील आघाडीची एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार आणि डॉइश पोस्ट डीएचएल (DHL) ग्रुपचा (डीपीडीएचएल) एक भाग असलेल्या ब्लू डार्टने (BLUE DART) सण-उत्सवांच्या आनंदात भर घालत दिवाळी एक्स्प्रेस ऑफर (Diwali Express Offer) सादर केली आहे. ही ऑफर 11 ऑक्टोबर, 2021 ते 6 नोव्हेंबर, 2021 या कालावधीसाठी वैध आहे.

या अंतर्गत स्थानिक व आंतरराष्ट्रीय (National and International) अशा दोन्ही प्रकारच्या शिपमेंट्सवर (Shipments) 40% डिस्काउंटचा (Discount) लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सर्व लॉजिस्टिक (Logstics) गरजांसाठी वन-स्टॉप सोल्युशन उपलब्ध होणार आहे.

डोमेस्टिक ऑफर 2 किलो ते 10 किलोदरम्यानच्या सर्व स्थानिक डीपी शिपमेंट्सना लागू असेल तर आंतरराष्ट्रीय ऑफर ही 2 किलो ते 10 किलो, 15 किलो आणि 20 किलोच्या आंतरराष्ट्रीय नॉन डॉक आणि टीडीआय 12 नॉन डॉक शिपमेंट्सवर लागू आहे.

ग्राहकांना नेहमी सर्वोत्तम अनुभव मिळावा यासाठी ब्लू डार्टतर्फे त्यांची उत्पादने आणि सेवा सातत्याने अपग्रेड करण्यात येतात. या ऑफरसह, ग्राहक ही सेवा सवलतीच्या दरात प्राप्त करू शकतात आणि हॅम्पर्स, मिठाई, कपडे आणि इत्यादी अनेक वस्तू त्यांच्या आप्तेष्टांना भारतातील 35,000हून अधिक लोकेशन्स आणि जगभरातील 220 देशांमध्ये पाठवू शकतात.

ब्लू डार्टचे चीफ कॉमर्शियल ऑफिसर, केतन कुलकर्णी म्हणतात, “ब्लू डार्ट ही कायम ग्राहककेंद्री कंपनी राहिली आहे. आमचे ग्राहक व त्यांचे आप्तेष्ट एकमेकांपासून अनेक मैलांवर असले तरी त्यांना जोडण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. हेच लक्षात घेत दिवाळी एक्स्प्रेस ऑफ सादर करण्यात आली आहे. या सणासुदीच्या उत्साहाचा आमच्या ग्राहकांना आनंद घेता यावा आणि हा आनंद आपल्या आप्तेष्टांसोबत साजरा करता यावा, अशी आमची इच्छा आहे. आमच्या ग्राहकांना अतुलनीय व्हॅल्यू प्रपोझिशन उपलब्ध करून देत आहोत आणि ग्राहकांची शिपमेंट त्यांच्या आप्तेष्टांपर्यंत वेळेत पोहोचेल याची आम्ही खात्री देतो.”

सध्या सुरू असलेल्या साथीच्या काळातही ग्राहकांना खात्रीशीर उत्तम ग्राहकानुभव मिळावा यासाठी ब्लू डार्ट अविरत काम करत आहे. पुरठा साखळीचे सातत्य राखण्यापासून ते गेल्या वर्षात अनेक ग्राहककेंद्री डिस्काउंट्स ऑफर करून आणि ऑटोमेशन व तंत्रज्ञानाधारित सोल्यूशन्समध्ये वाढ करून देशात ट्रेड फॅसिलिटेटर म्हणून भूमिका निभावण्यासाठी ब्लू डार्टने प्रत्येक प्रकारे प्रयत्न केले आहेत. ब्लू डार्टने शिपिंग करताना संसर्गाची भीती न बाळगता ग्राहकांना सुरळीत एक्स्प्रेस लॉजिस्टिक्सचा अनुभव मिळतो.

या ऑरगनायझेशनसह ग्राहक पूर्णपणे संपर्करहीत अनुभव घेऊ शकतात. कारण ग्राहकांना विविध प्रकारच्या पेमेंट पद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात 16 डिजिटल वॉलेट्स, नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स, भारत क्यूआर कोड आणि युपीआय (भीम) या पेमेंट पद्धतींचा समावेश आहे.

ब्लू डार्टच्या सेवा प्राप्त करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी ग्राहक 1860 233 1234 या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा customerservice@bluedart.com येथे ईमेल पाठवू शकतात.

तुमच्या जवळपास असलेले ब्लू डार्ट काउंटर शोधण्यासाठी www.bluedart.com वर लॉग ऑन करा किंवा ॲपल स्टोअर व प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या ‘माय ब्लू डार्ड’ मोबाइल ॲप्लिकेशनचा वापर करा.