Risk of cancer from eating bread

पेट्रोल-डिझेल, गॅस सारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीनंतर आता ब्रेडच्या दरातही वाढ झाली आहे. स्लाईस ब्रेडच्या किमती 2 ते 5 रुपयांनी वाढल्या असून यामुळे सर्वसामान्यांचा नाश्ताही महागणार आहे. या दरवाढीमुळे सँडविचच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच महिन्यात ब्रेडच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे( Bread prices increased).

    मुंबई : पेट्रोल-डिझेल, गॅस सारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीनंतर आता ब्रेडच्या दरातही वाढ झाली आहे. स्लाईस ब्रेडच्या किमती 2 ते 5 रुपयांनी वाढल्या असून यामुळे सर्वसामान्यांचा नाश्ताही महागणार आहे. या दरवाढीमुळे सँडविचच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच महिन्यात ब्रेडच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे( Bread prices increased).

    केंद्रीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यावर्षी खुल्या बाजारात गव्हासाठी विक्री योजना जाहीर न केल्यामुळे मे महिन्यापासूनच ही दरवाढ अपेक्षित होती, त्यानुसार आता ब्रेड महागला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे इतर सर्वच वस्तूंच्या दरात वाढ होत असते. त्यानुसार, वाढत्या इंधनाच्या किंमती देखील ब्रेडच्या दरवाढीला कारणीभूत ठरली आहे.

    नव्या दरवाढीनुसार सुमारे 400 ग्रॅम पांढऱ्या ब्रेडची किंमत 33 रुपयांवरुन 35 रुपये, तर सॅंडवीचसाठी स्टॉलवर वापरल्या जाणाऱ्या 800 ग्रॅम ब्रेडची किंमत 65 रुपयांवरुन 70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यासोबतच ब्राऊन ब्रेडची किंमत 45 रुपयांवरुन 50 रुपये झाली आहे. ब्रेडच्या या दरवाढीमुळे सँडविचच्या दरांवरही परिणामही होण्याची शक्यता आहे.

    खुल्या बाजारात गव्हाच्या विक्रीवर केंद्राने नियंत्रण न आणल्यामुळे ब्रेडच्या किंमती महागल्या आहेत. डिसेंबर 2021 पासून ब्रेड तब्बल 5 ते 10 रुपयांनी महागला आहे.

    महागाईमुळे आधीच खिसा कापला जात असताना आता बिस्किटच्या किमतीही वाढविण्याचा निर्णय अधिकांश कंपन्यांनी घेतला असल्याचे समजते. यामुळे मध्यमवर्ग आणि सामान्यांचे टेन्शन वाढले आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात खाद्य पदार्थांचा पुरवठा मर्यादित झाला असून त्यामुळे खाद्य पदार्थांसह अन्य वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर्षी महागाईचा अंदाज 3 टक्के राहिल असा अंदाज होता परंतु या युद्धामुळे महागाईचा दर 8 ते 9 टक्क्यांवर पोहोचला असल्याचे मत उद्योगजगतातील जाणकारांनी व्यक्त केले.