sensex

१८२.४० अंकानी वधारून निफ्टी १४,५०७.३० वर स्थिरावला. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स ५२९ अंकानी वधारून ४८,९६९.२५ वर आणि निफ्टी १८१.४ अंकांनी वधारून १४,५०६.३० वर सुरू झाला होता.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क,मुंबई.

    शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला शुक्रवारी अखेर ब्रेक लागला. शुक्रवारी सेन्सेक्स ५६८ अंकांनी वधारून ४९,००८.५० वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी २६ शेअर्समध्ये वाढ नोंदविली गेली. यापूर्वी, दोन दिवस सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती. गुरुवारी सेन्सेक्स १,६११ अंकांनी गडगडून ४८,४४० वर स्थिरावला होता. याचबरोबर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही वाढ झाली.

    १८२.४० अंकानी वधारून निफ्टी १४,५०७.३० वर स्थिरावला. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स ५२९ अंकानी वधारून ४८,९६९.२५ वर आणि निफ्टी १८१.४ अंकांनी वधारून १४,५०६.३० वर सुरू झाला होता. गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ऑटो आणि मेटल सेक्टरमध्ये सर्वाधिक खरेदी केली. निफ्टी मेटल निर्देशांक ३.७% आणि ऑटो इंडेक्स १.२ टक्क्यांनी वधारला.