आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, कोणत्या क्षेत्राला काय मिळणार? सर्वांचे लक्ष

आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी नवीन घोषणा होणार का? उद्योग क्षेत्राला काय मिळणार? तसेच अर्थसंकल्पातून नेमकं कोणला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

    मुंबई : सध्या राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे, ३ मार्च ते २५ मार्च या दरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे. राज्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी नवीन घोषणा होणार का? उद्योग क्षेत्राला काय मिळणार? तसेच अर्थसंकल्पातून नेमकं कोणला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तसेच विरोधक सुद्धा आक्रमक झाल्याने आज सभागृहात सत्ताधारी व विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगणार आहे.

    दरम्यान, राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? सरकारी तिजोरीतील खडखडाट, कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा तसेच कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा जनतेला असल्यानं त्यांना काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    राज्याचा अर्थिक पाहणी अहवाल सादर

    दरम्यान, अर्थिक पाहणी अहवाल 2021-22 विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित आहे. महागाई, कोरोनामुळं आलेली बेरोजगारी, लॉकडाऊन आदीमुळं पिचलेल्या जनतेला आजच्या अर्थसंक