बजेट २०२३ : ६३ हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करणार ; निर्मला सीतारामन यांची घोषणा

सहकारातून समृद्धी साध्य करण्यासाठी नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ६३ हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आला. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीत स्टोरेज सुविधा निर्माण करण्यात येतील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत . त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली आहे.सहकारातून समृद्धी साध्य करण्यासाठी नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ६३ हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आला. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीत स्टोरेज सुविधा निर्माण करण्यात येतील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

    कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार असे सांगून त्यांनी शेतकरी वर्गाला सरकारने अर्थसंकल्पात दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे. सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र या सप्तर्षी या आर्थिक बजेट मध्ये प्रमुख असल्याचेही त्यांनी सांगितले .