
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प (Union Budget 2023 ) सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूदींची घोषणा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग पाचवा अर्थसंकल्प (Union Budget 2023 ) सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूदींची घोषणा करण्यात आली आहे. शहरातील वाहतुकीचे सुलभीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्टच्या विकासासाठी 75 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कृषी, उद्योग, शिक्षण यांसह इतर अनेक क्षेत्रांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सहकारातून समृद्धी साध्य करण्यासाठी नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 63 हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आला.
देशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात आज वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. देशातील वाहतुकीचे सुलभीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्टच्या विकासासाठी 75 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आज काही तरतूदी करण्यात आल्या. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्टसाठी 75 हजार कोटी रुपये तर अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10 हजार कोटी दिले जाणार आहेत.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काय तरतूदी
ट्रान्सपोर्ट इन्फ्रा प्रोजेक्टवर 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जातील. गटार साफ करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मशीनवर आधारित असेल
मिशन कर्मयोगी नागरी सेवकांची कार्यक्षमता वाढविण्याची घोषणा केली.
भारतीयांचं वार्षिक उत्रन्न वाढलं
देशातील भारतीयांचं वार्षिक सरासरी उत्पन्न आता १ लाख ९७ हजार रुपयांपर्यं वाढल्याचं अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलं आहे.