ट्रॉपिकानाच्या नव्या उन्हाळी जाहिरातीत अंगभूत वैशिष्ट्यांचा सोहळा

  • 'गुडनेस जो दिखती है' या नव्या जाहिरातीतून त्यांच्या खास पीईटी पॅकेजिंगवर भर

नवी दिल्ली : ट्रॉपिकाना या पेप्सीकोच्या आघाडीच्या ज्युस ब्रँडने यंदाच्या उन्हाळ्याचे स्वागत नव्या जाहिरातीने केले आहे. त्यांच्या चविष्ट आणि तजेलदार ज्युसेसच्या वैशिष्ट्यांवर या जाहिरातीत भर देण्यात आला आहे. या ब्रँडच्या नव्या पारदर्शक पीईटी पॅकेजिंगचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘गुडनेस जो दिखती है’ हे ब्रँडचे तत्व मांडणारी नवी जाहिरात आज या ब्रँडतर्फे सादर करण्यात आली. एखाद्यामधील अंगभूत चांगलेपणावर भर दिल्याने वाईट स्थितीही कशी बदलू शकते हे दाखवत या संदर्भात तरुणांना आकर्षून घेण्याचा या जाहिरातीचा उद्देश आहे.

जाहिरातीची सुरुवात होते यातील नायक आणि त्याचा मित्र रस्त्याच्या कडेला उभे आहेत इथून. एक भरधाव वेगाने जाणारी गाडी त्यांना दचकवते. दोघांपैकी एक जण रागावून ओरडतो. लगेचच ती भरधाव गाडी थांबते आणि एक बळकट देहयष्टीचा माणूस गाडीतून उतरतो. तो बलदंड माणूस आपल्याच दिशेने येतोय हे पाहून मित्राचा राग भीतीत बदलतो. पण, आपला नायक मात्र शांत आहे.

पारदर्शक बाटलीतून ट्रॉपिकानामधील ‘अंदर की गुडनेस’ तू पाहू शकतोस का असं तो मित्राला विचारतो. त्यामुळे मित्र अधिकच गोंधळतो आणि घाबरतो. गमतीशीर मार्शल आर्ट पोझेझ घेत नायक त्या बलदंड माणसाला गोंधळात पाडतो आणि अखेर ट्रॉपिकानाची बाटली त्याच्या तोंडला लावतो आणि त्याला शांत करतो. आता ट्रॉपिकाना प्यायल्याने तो बलदंड माणूस माफी मागतो आणि गाडी इतक्या वेगाने चालवल्याबद्दल त्याच्या मित्राची माफी मागत त्याला मिठी मारतो. ‘गुडनेस जो दिखती है’ असं ट्रॉपिकाना नायक दाखवतो आणि जाहिरात संपते.

व्हिडिओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

पेप्सीको इंडियाच्या ट्रॉपिकाना आणि स्लाइसचे असोसिएट डायरेक्टर अनुज गोयल म्हणाले, “भारतीय ज्युस ड्रिंक बाजारपेठेत ट्रॉपिकाना हा एक आघाडीचा ब्रँड आहे आणि यंदाच्या उन्हाळ्यात फक्त या ब्रँडसाठीच नाही तर या विभागासाठी अधिक वाढीच्या संधींचा वेध घेण्यास आम्ही सज्ज आहोत. अंगभूत वैशिष्ट्ये साजरी करणारी नवी ब्रँड जाहिरात सादर करताना आम्ही फारच उत्सुक आहोत. आम्हाला विश्वास आहे की या जाहिरातीसह नवी ओळख प्रस्थापित केल्याने ट्रॉपिकानाला ग्राहकांसोबत दृढ संबंध निर्माण करण्यात आणि या ब्रँडची विश्वासार्हता कायम राखण्यात साह्य होईल.”

ट्रॉपिकानाची पीईटी बॉटल वाजवी दरात उपलब्ध आहे, ती आकर्षक आहे आणि नवनवीन पॅकेजिंगमध्ये अग्रणी असण्याची ब्रँडची बांधिलकीही यातून प्रतित होते. २०० मिली., ५०० मिली. आणि १ ली. अशा प्रकारात हे ज्युस सर्व आधुनिक आणि पारंपरिक रिटेल आऊटलेट तसेच आघाडीच्या ई-कॉमर्स व्यासपीठांवर उपलब्ध आहे. नव्या जाहिरातीला टीव्ही, डिजिटल, आऊटडोअर आणि सोशल मीडिया अशा परिपूर्ण मोहिमेची जोड दिली जाईल.