केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा, आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटींच पॅकेज जाहीर- ८ क्षेत्रांसाठी नव्या योजना

केंद्र सरकारने(Central Government Declared Help) आरोग्य क्षेत्रासोबतच(Medical Sector) एकूण ८ क्षेत्रांसाठी नव्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य सुविधेसाठी ५० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

    दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनाच्या(Corona) पार्श्वभूमीवर देशात आरोग्यविषयक संकट उभं राहिलं असताना त्याचा परिणाम म्हणून त्यापाठोपाठा देशावर आर्थिक संकट(Economic Issue) देखील ओढवलं आहे. अशातच केंद्र सरकारने(Central Government Declared Help) आरोग्य क्षेत्रासोबतच(Medical Sector) एकूण ८ क्षेत्रांसाठी नव्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य सुविधेसाठी ५० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

    कोरोना काळात आव्हान निर्माण झालेल्या आरोग्य क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार आहे. याव्यतिरिक्त इतर विभागांसाठी ६० हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

    गेल्या वेळी आत्मनिर्भर रोजगार योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या घोषणेनुसार ज्या कंपन्यांची कर्मचारी संख्या १००च्या आत आहे आणि नव्याने नोकरीवर ठेवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महिना पगार १५ हजारपर्यंत आहे, अशा कर्मचाऱ्यांचा १२ टक्के पीएफचा हिस्सा आणि अशा कंपन्यांचा १२ टक्के असा एकूण २४ टक्के पीएफचा हिस्सा हा केंद्र सरकारकडून भरला जाईल. आता या योजनेची मर्यादा पुढे वाढवत ३० जून २०२१ पासून ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.

    भारतात येणाऱ्या पहिल्या ५ लाख परदेशी व्यक्तींना व्हिजा शुल्क द्यावं लागणार नाही. व्हिजा देण्यास सुरुवात झाल्यानंतर ३१ मार्च २०२२ पर्यंत ही योजना लागू असेल. यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल. एका पर्यटकाला किंवा परदेशी व्यक्तीला एकदाच या योजनेचा फायदा घेता येईल. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर १०० कोटींचा भार पडणार आहे.