चला ‘नैसर्गिक’ते कडे; गुडनेसमीच्या ऑर्गेनिक, प्रमाणित शुद्ध आणि शून्य टॉक्सिन उत्पादनांच्या श्रेणीतून आपल्या बाळांसाठी निवडा प्रमाणित ऑर्गेनिक उत्पादने

गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्सने बाळांच्या नाजूक त्वचेसाठी गुडनेसमी (goodnessme) ही ऑर्गेनिक घटकांपासून निर्मित आणि शून्य टॉक्सिन्स असलेल्या प्रमाणित उत्पादनांची प्रिमियम श्रेणी बाजारात आणली आहे.

  बाळाच्या त्वचेवरील सर्वात वरचा स्तर हा प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत ३० टक्‍के पातळ असतो. म्हणूनच बाळांची त्वचा अत्यंत संवेदनक्षम आणि सच्छिद्र असते. म्हणूनच त्यांच्यासाठी शुद्ध घटकांपासून बनविलेल्या आणि अत्यंत सुरक्षित अशा उत्पादनांमधून निवड करणे आवश्यक बनून जाते. आपल्याला माहीतच आहे की ऑर्गेनिक उत्पादने हा निसर्गाचा शुद्धतम अविष्कार असतो, ज्यात कोणत्याही घातक रसायनांचा, किटकनाशके किंवा रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. थोडक्यात निसर्गमातेच्या इच्छेनुसार सारे काही होते आणि या उत्पादनांत शून्य टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्यांचा वापर केला जात नसल्याने ही उत्पादने वापरासाठी अत्यंत सुरक्षित असतात.

  आज बाजारात उपलब्ध असलेली आणि नैसर्गिक असल्याचा दावा करणारी उत्पादने ही १०० टक्‍के सुरक्षित असतीलच याची हमी देता येत नाही. (उत्पादन बनविणारे आपल्या उत्पादनांना बाजारात ‘नैसर्गिक’ म्हणून खपविण्यासाठी त्या उत्पादनांमध्ये अवघ्या ०.०१ टक्‍के इतक्या नगण्य मात्रेमध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश करू शकतात.) याचा अर्थ या तथाकथित ‘नैसर्गिक’ उत्पादनांमध्ये हानीकारक प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि रसायांचा तसेच किटकनाशकांचा वापर करून वाढविलेल्या विषद्रव्ययुक्त घटकांचा समावेश असू शकतो.

  पालकांसमोरील हा पेच लक्षात घेऊनच गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्सने बाळांच्या नाजूक त्वचेसाठी गुडनेसमी (goodnessme) ही ऑर्गेनिक घटकांपासून निर्मित आणि शून्य टॉक्सिन्स असलेल्या प्रमाणित उत्पादनांची प्रिमियम श्रेणी बाजारात आणली आहे.

  गुडनेसमी उत्पादनांच्या निर्मितीमध्ये घातक रसायनांचा वापर शक्य तितका टाळण्यात आलेला आहे. जगभरातून मागविल्या गेलेल्या नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्या या उत्पादनांच्या निर्मितासाठी ३ वर्षे संशोधन व चाचण्या केल्या जात होत्या. बेबी स्कीन केअर उत्पादनांच्या या श्रेणीला जगातील काही सर्वात मोठ्या ऑर्गेनिक सर्टिफिकेशन संस्थांपैकी एक असलेल्या इकोसर्ट (ECOCERT), फ्रान्स या संस्थेने कॉसमॉस ऑर्गॅनिक प्रमाणपत्र दिले आहे.

  कच्च्या मालाची चाचणी, फॉर्म्युलानिर्मितीसाठीच्या मंजुरी, अगदी वार्षिक फॅक्टरी ऑडिट्सपर्यंतच्या अनेक स्तरांवरील कठोर नियामक प्रक्रिया पार केल्यावरच हे प्रमाणपत्र मिळवता येते. या नियमावलीमध्ये युरोपियन प्रमाणनानुसार बेबी प्रोडक्ट्ससाठी अयोग्य मानल्या गेलेल्या १३०० हून अधिक घटकांच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. अशा काटेकोर नियमावलीचे पालन करून बनविलेल्या या उत्पादनांमध्ये कोणतीही टॉक्सिन्स, पॅराबिन्स, पेट्रोलियम, थालेट्स, कृत्रिम सुगंध, खनिज तेले किंवा सिलिकॉन्स यांचा वापर नाही यात कोणतेही नवल नाही. ज्यामुळे ग्राहकांना १०० टक्‍के पारदर्शकतेची हमी मिळते आणि शुद्धतेच्या वचनावरील विश्वास नव्याने दृढ होतो.

  गुडनेस उत्पादने युरोपियन प्रमाणकांव्यतिरिक्तही अनेक खडतर चाचण्यांमधून जातात व ही उत्पादने हायपोअलर्जेनिक, डर्मटोलॉजीच्या निकषांवर तपासली गेलेली, बालरोगतज्ज्ञांद्वारे प्रमाणित, प्राणीजन्य घटक वर्ज्य असणारी आणि प्राण्यांवरील क्रूरतेचा समावेश नसलेली आहेत. या साऱ्यामुळे ही उत्पादने अत्यंत सौम्य आणि बाळांच्या नाजूक त्वचेसाठी सुरक्षित उत्पादने आहेत.

  ०-२ वर्षे वयोगटीतल लहानग्यांसाठी असलेल्या गुडनेसमी उत्पादनांच्या श्रेणीमध्ये प्रमाणित ऑर्गेनिक बेबी सोप; प्रमाणित ऑर्गेनिक बेबी ऑइल; सर्टिफाइड ऑर्गेनिक बेबी मॉइस्चरायझर; सर्टिफाइड ऑर्गेनिक मल्टिपर्पज बेबी क्रीम; प्रमाणित ऑर्गेनिक बेबी हेड-टू-टो वॉश आणि अशा वेगवेगळ्या प्रकारांतील बहुविध उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने सेंद्रीय घटकांपासून बनविलेली आहेत व त्यात शून्य टॉक्सिन्सचा वापर झाला आहे, त्यामुळे ती बाळाच्या संवेदनक्षम त्वचेसाठी अगदी साजेशी आहेत.

  बाळाच्या मालिशसाठीची उत्पादने:

  गुडनेसमी ऑर्गेनिक बेबी ऑइल :

  उत्पादनाची माहिती: बदाम, ऑलिव्ह, होहोबा, तीळ, आर्गन, सॅफ्फ्लॉवर या सहा ऑर्गेनिक तेलांची शुद्धतम मिसळण – आणि यातील ई जीवनसत्त्व त्वचेचे पोषण व संरक्षण करते व बाळाच्या नाजूक त्वचेला शांत करते.
  उपलब्ध आकार: १०० मिली रु. ७०० / आणि २००मिली रु. १३५० / –

  गुडनेसमी ऑर्गॅनिक कोकोनट बेबी हेअर अँड मसाज ऑइल:

  उत्पादनाची माहिती : बाळांच्या केसांसाठीचे १०० टक्‍के ऑर्गॅनिक आणि कोल्ड-प्रेस्ट खोबरेल तेल तुमच्या बाळाच्या केसांच्या मूळांचे संरक्षण व पोषण करते आणि त्यांचे कंडिशनिंग करते, यामुळे त्यांच्या केसांना हानी पोहोचत नाही, त्यांची वाढ चांगली होते व ते अधिक मऊ व चमकदार दिसतात. हे तेल बाळांच्या मालिशीसाठीसुद्धा अतिशय चांगले आहे आणि त्यातील अँटी-फंगल व अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचा त्रस्त होण्यापासून संरक्षण देतात.
  उपलब्ध आकार: १ नग X १०० मिली. रु. २९९

  बाळांच्या आंघोळीसाठी उत्पादने:

  गुडनेसमी सर्टिफाइड ऑर्गेनिक बेबी हेड-टू-टो फोम वॉश

  उत्पादनाची माहिती:

  एक प्रमाणित बेबी हेड-टू-टो फोम वॉश हे थ्री-इन-वन सौम्य क्लेन्झर आहे, जे बाळाचा चेहरा, केस व अंग स्वच्छ करते. शॅमोमाइल, गुलाब आणि लव्हेंडर यांसारख्या नैसर्गिक घटकांच्या चांगल्या गुणधर्मांपासून बनविलेला हा वॉश फोम स्वरूपातील असून बाळाच्या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या संपूर्ण आंघोळीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आदर्श आहे.
  उपलब्ध आकार: २०० मिली रु. ४७० / आणि ४०० मिली रु. ९०० /

  गुडनेसमी सर्टिफाइड ऑर्गेनिक बेबी सोप

  उत्पादनाची माहिती:

  होहोबा तेल, ऑलिव्ह तेल आणि शॅमोमाइल यांच्या गुणकारी तत्त्वांपासून बनेलेला हा प्रमाणित ऑर्गेनिक, अत्यंत सौम्य साबण प्रत्येक आंघोळीनंतर बाळाची त्वचा अगदी हळुवारपणे स्वच्छ करतो व तिला स्निग्धता मिळवून देतो.
  उपलब्ध आकार: १ नग X १०० ग्रॅ. रु. २५० / २ नग X १०० ग्रॅ. रु. ४०० / आणि ४ नग X ५०ग्रॅ रु. ४२५ /

  लोशन्स आणि क्रीम्स:

  गुडनेसमी सर्टिफाइड ऑर्गेनिक बेबी लोशन

  उत्पादनाची माहिती:

  हे प्रमाणित ऑर्गेनिक बेबी लोशन हे अत्यंत सुरक्षित मॉइश्चरायझिंग लोशन असून ते बाळाच्या त्वचेचे पोषण होण्यास मदत करते व , ती दिवसभर मऊ-मुलायम ठेवते. शीया बटर आणि ॲलो व्हेरा यांसारख्या प्रमाणित ऑर्गेनिक घटकांच्या गुणांनी युक्त असे हे लोशन बाळांच्या केवळ सर्वात सौम्य संरक्षण आणि पोषणाची गरज असणा-या नाजूक त्वचेसाठी सुयोग्य आहे.
  उपलब्ध आकार: १०० मिली २३० रु./ २०० मिली रु. ४१० / ४००मिली रु. ७३० / व २ नग X ४००मिली रु. १४६०

  गुडनेसमी सर्टिफाइड मल्टी-पर्पज बेबी क्रीम

  उत्पादनाची माहिती: तुम्ही सर्वोत्तम बेबी क्रीमच्या शोधात असा किंवा ऑर्गेनिक डायपर रॅश क्रीमचा शोध घेत असा, या सर्टिफाइड ऑर्गेनिक बहुउपयोगी बेबी क्रीमपाशी येऊन तुमचा शोध थांबेल. शॅमोमाइल, ॲलो व्हेरा, ग्लिसरीन आणि गुलाब पाण्यासारख्या नैसर्गिक घटकांच्या गुणांपासून बनविलेले हे अतिशय चांगले क्रीम म्हणजे तुमच्या त्वचेला चट्टे, लालसरपणा, लहानमोठ्या चिरा, त्वचेचा दाह आणि कोरडेपणा अशा सर्व समस्यांपासून सुरक्षित ठेवते. त्वचेच्या अनेक समस्यांसाठी हे एकमेव उत्तर आहे.

  उपलब्ध आकार: ५०ग्रॅ रु. ३५० /आणि १०० ग्रॅ रु. ६५० /

  प्रथम डिजिटल मंचावर दाखल होत असलेला ब्रॅण्ड असल्याने गुडनेसमीची उत्पादने सध्या केवळ ऑनलाइन उपलब्ध असतील व ब्रॅण्डची वेबसाइट (www.goodnessme.com) तसेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि फर्स्टक्रायसारख्या ऑनलाइन बाजारपेठांमध्ये मिळू शकतील. गुडनेसमीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे भेट द्या.