share market

आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज २७४ अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) ८४ अंकांची वाढ झाली.

    मुंबई: सलग तीन दिवस शेअर बाजारामध्ये घसरण सुरु होती. मात्र आज शेअर बाजार (Closing Bell Share Market Updates) सावरल्याचं दिसून आलं. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज २७४ अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) ८४ अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज ०.४५ टक्क्यांची वाढ होऊन तो ६१,४१८ अंकांवर गेला, तर निफ्टीमध्ये ०.४६ टक्क्यांची वाढ झाल्यानंतर तो १८,२४४ अंकांवर बंद झाला. निफ्टी बँकमध्येही आज ११० अंकांची वाढ होऊन तो ४२,४५७ अंकांवर बंद झाला.

    आज बाजार बंद होताना (Closing Bell Share Market Updates) १५८७ शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली . तर १७७२ शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण १४० शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना IndusInd Bank, NTPC, JSW Steel, HDFC Life आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ नोंदवण्यात आली. तर BPCL, Nestle India, Bharti Airtel, Power Grid Corporation आणि Kotak Mahindra Bank कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.

    सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये आज १.६ टक्क्यांची वाढ झाली, तर पॉवर आणि रिएलिटी इंडेक्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली. बीएसई मिडकॅपमध्ये ०.५ टक्क्यांची वाढ झाली तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये काहीशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९४ अंकांच्या तेजीसह ६१,२३४ अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २१ अंकांच्या तेजीसह १८,१८० अंकांवर खुला झाला. आज, पेटीएम कंपनीच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली.