‘प्रोटीयन इ-गव्ह टेक्नोलॉजीज’ (पूर्वीची एनएसडीएल इ-गव्हर्नंस इन्फ्रास्ट्रक्चर) तर्फे इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्स’सोबत शेवटच्या टप्प्यातील आरोग्यसुरक्षेत परिवर्तनासाठी सहयोग

ओपीडी क्लिनिक्समध्ये (OPD Clinics) वापरली जाणारी यंत्रणा प्रमाणित केली जाईल आणि त्या ठिकाणांचा ‘प्रोटीयन प्रमाणित स्मार्ट क्लिनिक्स’ (Protean Certified Smart Clinics) असा प्रचार केला जाईल. या क्लिनिक्समध्ये विशेषकृत सेवा उपलब्ध असतील आणि येथे सर्वोच्च पातळीवरील खासगीपणा व सुरक्षा निकषांचे पालन केले जाईल.

  • प्रोटीयन क्लिनिक सादर करणार, सर्वसाधारण उपचार करणाऱ्या क्लिनिक्समध्ये स्पेशालीस्ट सुविधा आणणार

मुंबई : देशातील करोडो लोकांना सुधारित प्राथमिक आरोग्य सुरक्षा सेवा पुरविण्याच्या आपल्या ध्येयधोरणाला अनुसरून ‘प्रोटीयन’ (पूर्वीची एनएसडीएल इ-गव्हर्नंस) या भारतातील आघाडीच्या ई – गव्हर्नंस संस्थेतर्फे प्रोटीयन क्लिनिक (Protean Clinic) हे आपले आरोग्यसुरक्षा उपयोजन सादर केले असून त्यासाठी ‘इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्स’ (Indian Academy of Pediatrics) च्या आयएपी कार्यक्रमासोबत सहयोग केला आहे. आयएपीचे सभासद असलेल्या ३५,००० बालरोगतज्ञांना आणि त्यापाठोपाठ अन्य ओपीडी क्लिनिक्सना ही यंत्रणा पुरविली जाणार आहे; ज्यायोगे त्यांना वेळेवर आजाराचे निदान (डायग्नोसिस) करणे, स्पेशलाईज्ड उपचार पुरविणे आणि रुग्णांना सामावून घेण्याची उत्कृष्ट क्षमता अंगीकारणे शक्य होईल आणि त्यामुळे क्लिनिकमध्ये तसेच घरी देखील आजारांना रोखणे, आजारांचे डायग्नोसिस करणे, त्यांवर उपचार करणे आणि त्यांचे अधिक सुयोग्य व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

ओपीडी क्लिनिक्समध्ये (OPD Clinics) वापरली जाणारी यंत्रणा प्रमाणित केली जाईल आणि त्या ठिकाणांचा ‘प्रोटीयन प्रमाणित स्मार्ट क्लिनिक्स’ (Protean Certified Smart Clinics) असा प्रचार केला जाईल. या क्लिनिक्समध्ये विशेषकृत सेवा उपलब्ध असतील आणि येथे सर्वोच्च पातळीवरील खासगीपणा व सुरक्षा निकषांचे पालन केले जाईल. भारत सरकारच्या राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेच्या (National Digital Health Campaign) संपूर्ण नेटवर्कला जोडून घेण्याचा प्रोटीयनचा मानस असून तसे झाल्यामुळे अचूक आणि प्रत्यक्ष त्यावेळेचा रोगपरिस्थिती विशद करणारा डेटा मिळविण्यात सध्या देशात असलेली तफावत आणि कमततेची समस्या दूर होऊ शकेल, जेणेकरून देशभरातील आरोग्यसुरक्षा धोरण आणि दर्जा यांना बळकटी मिळेल.

आज करोडो भारतीय उशीरा किंवा चुकीच्या होणाऱ्या डायग्नोसिस आणि उपचारांमुळे त्रस्त असून या परिस्थितीला सध्या देशात असलेली स्पेशालीस्टांची तसेच ओपीडी क्लिनिकमध्ये असणारी स्पेशालीस्ट सेवांची कमतरता कारणीभूत आहे. ओपीडी क्लिनिक्स रुग्णांच्या घरापर्यंत आपली पोहोच विस्तारित करू शकत नाहीयेत. ओपीडी क्लिनिक्समध्ये स्पेशालीस्ट क्षमतेच्या सेवा उपलब्ध करून देणे ही आता काळाची नितांत गरज बनलेली असून त्यामुळे रोगाचे वेळेवर डायग्नोसिस होऊ शकते, स्थानिक स्तरावर उपचार मिळू शकतात आणि स्पेशालीस्टांच्या सल्ला मार्गदर्शनाखाली वेळेवर अन्यत्र उपचारांचे रेफरल्स दिले जाऊ शकतात. जीवनशैलीशी निगडीत आजार रोखण्यासाठी आणि अन्य कित्येक गंभीर परिस्थितीमध्ये खबरदारीची उपाययोजना म्हणून स्पेशालीस्ट सेवा गरजेच्या ठरतात. त्या जोडीला, ओपीडी क्लिनिक्सने रुग्णसेवेची व्याप्ती वाढविणे आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित (हायटेक) उपकरणे वापरात आणणे आवश्यक बनले आहे, जेणेकरून रुग्ण क्लिनिकमध्ये येण्याच्याही आधीच आजाराचे वेळीच डायग्नोसिस करणे आणि उपाययोजना करणे शक्य होईल.

प्रोटीयन क्लिनिक मुळे डॉक्टरांना आपल्या रुग्ण समुदायाशी अधिक घट्टपणे जोडले जाणे शक्य होणार असून त्यामुळे वेळेवर तपासण्या करणे, अतिदक्षतेची स्थिती शोधून काढणे, उपाययोजना करणे आणि वेळेवर डायग्नोसिस करणे, स्पेशालीस्टांच्या सल्ला मार्गदर्शनाखाली विशेष उपचार करणे आदी शक्य होईल. या क्लिनिक्समध्ये गंभीर व जुनाट आजारांसाठी स्पेशलाईज्ड विश्लेषण, खबरदारीच्या उपायोजना आणि व्यवस्थापन सेवा देखील उपलब्ध होणार आहेत.

आपल्या ४४,००० ठिकाणच्या एकात्मिक नेटवर्कमधील स्थानिक पातळीवरील हजारो आरोग्य सेवकांना अत्याधुनिक उपकरणे पुरवून सज्ज करण्याचे प्रोटीयनचे ध्येय आहे. यामुळे सहाय्यक टेलीमेडिसिन (दूरस्थ पद्धतीने आरोग्याची, आजाराची तपासणी) सुविधा पुरविणे, आरोग्य देखभाल भेटी आयोजित करणे, वेगवान डायग्नोस्टिक सेवा पुरविणे, तपासणी करणे आणि लक्ष नोंद ठेवणे आदीकरीता देशभरातील ओपीडी क्लिनिक्स सक्षम बनतील. मूलतः क्लिनिकच्या सेवांचा विस्तार करणे, सीमारेखांचा अडसर दूर करणे आणि क्लिनिकच्या चौकटी पलीकडे जाऊन काळजी घेणे डॉक्टरांना शक्य होणे या गोष्टी या व्यासपीठाद्वारे साध्य केल्या जाणार आहेत.

प्रोटीयनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सेठी म्हणाले, “आजारांचे वेळेत डायग्नोसिस व्हावे आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवांच्याद्वारे स्पेशालीस्टांच्या सल्ला मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर उपचार मिळवून देण्यासाठी ओपीडी क्लिनिक्सचा अतिशय वेगाने क्षमता विस्तार घडवून आणणे ही आज आपल्या देशासमोरची मोठी गरज आहे. आपल्या भक्कम तांत्रिक पायाभूत सुविधेच्या पाठबळावर सर्व भारतीयांना अधिक चांगल्या प्राथमिक आरोग्य सुरक्षा सुविधा पुरविण्याचे आमच्या या नव्या सहयोगाचे उद्दिष्ट आहे. इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्ससोबत भागीदारी करताना आणि अधिक चांगल्या बाल आरोग्य सुरक्षेसाठी त्यांच्या सर्व डॉक्टरांना आमचे अद्ययावत व्यासपीठ उपलब्ध करून देताना आम्हाला अतिशय समाधान मिळत आहे.”

आयएपीचे सध्याचे, आगामी आणि अलीकडचे माजी अध्यक्ष डॉ. पियुष गुप्ता, डॉक्टर रमेश कुमार आणि डॉ. बकुळ पारेख म्हणाले, “देशव्यापी स्तरावर स्पेशालिस्ट क्षमतांचा विकास घडवून आणण्याची आज नितांत आवश्यकता आहे. सर्वसाधारण पेडीयाट्रिक्स क्लिनिकना स्पेशलाईज्ड सेवा, डायग्नोस्टिक पाठींबा आणि हाय-टेक डायग्नोस्टिक उपकरणे याद्वारे समृध्द आणि सक्षम बनविण्याची खूप जास्त गरज असून तसे झाल्यामुळे जवळपास १०० दशलक्ष बालकांच्या आरोग्यामध्ये सुधार घडवून आणण्यासाठी सहाय्य होणार आहे. भारतातील बालकांकरीता असलेल्या या कार्यक्रमासाठी प्रोटीयनसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”