नवी कररचना स्वीकारावी की जुनी, करदात्यांमध्ये निर्माण होणार संभ्रम; जाणून घ्या नवीन व जुन्या कर प्रणालीतील फरक?

अर्थमंत्र्यांनी सांगितले की नवीन कर प्रणाली आता डीफॉल्ट कर प्रणाली असेल परंतु करदाते जुन्या कर प्रणालीची निवड करू शकतात. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सरकारने करदात्यांच्या अनुपालनाचा बोजा कमी केला आहे. एका दिवसात सर्वाधिक ७२ लाख आयटी रिटर्न भरले गेले आहेत.

  नवी दिल्ली– आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करताना सामान्यांना, नोकरदारांना, कामगारांना, कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची व मोठी घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महागाई, बेरोजगारी, सतत इंधनाचे वाढत जाणारे भाव आदी आव्हानं सरकारसमोर असताना, आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सामान्यांना दिलासा दिला आहे. करांबाबात अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पाहूया नेमका कशा प्रकारे भरावा लागणार वार्षिक कर? तुमचं उत्पन्न किती? आणि तुमचा कर किती? अर्थसंकल्पातील घोषणेनंतर तुम्हांला आता किती भरावा लागणार कर, पाहूयात नवीन कर प्रणाली…

  कसा भरावा लागणार कर?

  आता 9 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ 45 हजार रुपये भरावे लागतील. तसेच 1.5 लाख रुपयांचा आयकर 15 लाखांपर्यंत भरावा लागणार आहे. तीन ते सहा लाख रुपयांपर्यंत कराचा दर ५ टक्के असेल, असे ते म्हणाले. 6 ते 9 लाखांपर्यंत 10 टक्के, 9 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के, 12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल. नऊ लाख उत्पन्न असलेल्यांना 45,000 रुपये भरावे लागतील, जे पाच टक्के आहे. आता 60 हजार द्यावे लागतील. म्हणजे 25 टक्के कमी होईल. 15 लाख उत्पन्नावर फक्त 10 टक्के भरावे लागेल. यापूर्वी त्याला 187000 रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच आता त्यांना 20 टक्के कमी कर भरावा लागणार आहे. नवीन कर प्रणालीमध्ये, रु. 52,500 पर्यंतची मानक वजावट रु. 15.5 लाख आणि त्यावरील करांसाठी देण्यात आली आहे. कमाल अधिभार दर 37 टक्क्यांवरून 25 टक्के करण्यात आला आहे.

  ७ लाखांपर्यंत कर नाही

  दरम्यान, जीवनाचा भाग म्हणजे वार्षिक उत्पन्नातील वैयक्तिक कर याबाबत अर्थमंत्र्यांनी मोठा व लोकांच्या हिताच्या निर्णय घेतला आहे. आता सात लाखांपर्य़ंत ज्यांचे वार्षिक उत्पन्न आहे, त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही, त्यामुळं नोकरदार, कामगार, कर्मचारी आदींना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ७ लाख उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर नाही. तर ९ लाख उत्पन्नासाठी ४४ हजार रुपये कर भरावा लागणार आहे. तसेच स्टँडर्ड डिडक्शन १५.५ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ५२ हजार सरचार्ज ३७ टक्क्यांवरुन २५ टक्के असेल.

  नवीन की जुनी कर प्रणाली करदात्यांमध्ये संभ्रम

  अर्थमंत्र्यांनी सांगितले की नवीन कर प्रणाली आता डीफॉल्ट कर प्रणाली असेल परंतु करदाते जुन्या कर प्रणालीची निवड करू शकतात. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सरकारने करदात्यांच्या अनुपालनाचा बोजा कमी केला आहे. एका दिवसात सर्वाधिक ७२ लाख आयटी रिटर्न भरले गेले आहेत. यावर्षी 6.5 कोटी आयटी रिटर्न भरले गेले आहेत. आयटी रिटर्नची प्रक्रिया करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ 2013-14 मध्ये 93 दिवसांवरून 16 दिवसांवर आला आहे. 45% IT रिटर्न फॉर्म 24 तासांच्या आत प्रक्रिया केले जातात.

  इनकम टैक्स स्लैब
  3 से 6 लाख रुपये 5%
  6 से 9 लाख रुपये 10%
  9 से 12 लाख रुपये 15%
  12 से 15 लाख रुपये 20%
  15 लाख से ऊपर 30%

  कशी होती जुनी कर प्रणाली?

  जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नासाठी पाच टक्के स्लॅब दर लागू आहे. 5 लाख ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के स्लॅब दर आहे. 10 लाख ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर 30% स्लॅब दर लागू आहे. त्याचप्रमाणे, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के स्लॅब दर आहे. असे मानले जात होते की सरकार कर सूट मर्यादा 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करू शकते. यामुळे करदात्यांना दिलासा मिळेल आणि गुंतवणुकीसाठी त्यांच्या हातात जास्त पैसा असेल.

  कशी आहे नवीन कर प्रणाली?

  करदाते जुन्या कर प्रणालीतील कलम 80C आणि 80D वापरून कर वाचवू शकतात. पण अशा अनेक सवलती नव्या व्यवस्थेत रद्द करण्यात आल्या. यामुळेच करदात्यांनी त्याला किंमत दिली नाही. यामध्ये अडीच लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत 5%, 5 ते 7.5 लाख रुपयांपर्यंत 10%, 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंत 15%, 10 ते 12.5 लाख रुपयांपर्यंत 20%, 12.5 लाख ते 15 लाखांपर्यंत 25% आणि 15 लाख रु.वरील वार्षिक