corona virus period Smartphone sales hit record highs with Indians buying phones worth Rs 4.5 crore in September October
स्मार्टफोन विक्रीने गाठला उच्चांक, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतीयांनी केले साडेचार कोटींचे फोन खरेदी

कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम वाढले. त्यामुळे नवीन स्मार्टफोन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला. ऑनलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन शॉपिंग फेस्टिवलमध्ये घसघशीत सूट मिळाल्यानेही स्मार्टफोन खरेदीत वाढ झाली आहे.

मुंबई : कोरोना महामारीमुळे देशातल्या काही क्षेत्रांना मोठी झळ सोसावी लागली आहे तर काही क्षेत्रांत रेकॉर्डब्रेक उलाढाल झाली झाली आहे. विशेषत: स्मार्टफोन, लॅपटॉप, वर्प फ्रॉम होम गॅझेट इंडस्ट्रीला अच्छे दिन आले आहेत. स्मार्टफोन खरेदी करण्यात तर भारतीयांचा हात कोणीच धरू शकणार नाहीये. सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये तर ४ कोटी ४० लाख फोनची खरेदी झाली आहे.

आयडीसी इंडियाच्या अहवालानुसार, २०२०च्या तिसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनची मागणी अपेक्षेपेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर २० मध्ये भारतीयांनी दोन कोटी १० लाख स्मार्टफोनची खरेदी केली. त्याआधी सप्टेंबर महिन्यात दोन कोटी ३० लाख स्मार्टफोनची विक्री झाली. कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम वाढले. त्यामुळे नवीन स्मार्टफोन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला. ऑनलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन शॉपिंग फेस्टिवलमध्ये घसघशीत सूट मिळाल्यानेही स्मार्टफोन खरेदीत वाढ झाली आहे.

महानगरांमध्ये झालाय खरेदीचा विक्रम

मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये २५ टक्के स्मार्टफोन खरेदी झाली आहे. त्या खालोखाल जयपूर, गुरुग्राम, चंदीगड, लखनऊ, भोपाळ आणि कोईम्बतूर या शहरांत स्मार्टफोन विक्री जास्त झालेय.