पासवर्डशिवाय डिजिटल खाते होणार अनलॉक

पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासातून लवकरच सुटका होईल अशी आशा आहे. अॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या जगातील तीन मोठ्या कंपन्यांनी पासवर्डशिवाय साइन इन करण्याच्या सुविधेवर काम सुरू केले आहे(Digital account without password will be unlocked). 

    दिल्ली : पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासातून लवकरच सुटका होईल अशी आशा आहे. अॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या जगातील तीन मोठ्या कंपन्यांनी पासवर्डशिवाय साइन इन करण्याच्या सुविधेवर काम सुरू केले आहे(Digital account without password will be unlocked).

    येत्या काही वर्षांत पासवर्ड पूर्णपणे काढून टाकले जातील. येत्या काळात फोन अनलॉक करण्यासाठी पासवर्डऐवजी फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशनचा वापर केला जाईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. हेच तंत्र इतर खात्यांमध्ये देखील वापरले जाऊ शकते.
    अॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट ने फिडो अलायन्स आणि वर्ल्ड वाइड वेब ची नवीन मानके स्वीकारली आहेत.

    या अंतर्गत अॅप किंवा पासवर्डचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने केला जाईल. फीडो (फास्ट आयडेंटिटी ऑनलाइन) ही वेबसाइट आणि अॅप्समध्ये जलद आणि सुरक्षित प्रवेशासाठी वचनबद्ध असलेली मुक्त उद्योग संघटना आहे.