डिजिटल रुपया ते क्रिप्टोकरन्सी काय आहे आर्थिक गणित! जाणून घ्या

डिजिटल कर्नसीची कल्पना नवी नाही. २००९ साली आलेल्या क्रिप्टो करन्सीच्या बिट कॉईनप्रमाणेच ही कल्पना पुढे आलेली आहे. याच्यासोबतच ईथर, डॉगेकॉईन यासारख्या अनेक क्रिक्पोट करन्सी लाँच झालेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत संपत्ती म्हणून याकडे पाहण्यात येते आहे, आणि अनेक जण त्यात गुंतवणूकही करीत आहेत.

    नवी दिल्ली- मार्चमध्ये सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात डिडिटल रुपया (Digital Rupee) बाजारात येणार आहे. या डिजिटल करन्सीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामण यांनी आपल्या बजेटच्या भाषणात केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याची पूर्म तयारी केल्याची माहितीही सीतारमण यांनी दिली आहे.  ही भारतीय डिजिटल करन्सी, जगभरात सुरु असलेल्या बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच ब्लॉकचेन आणि इतर क्रिप्टो यंत्रणेवर आधारित असेल.

    देशाच्या अर्थव्यवस्थेला येणार उभारी

     

    डिजिटल करन्सी आल्यानंतर, देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक उभारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या डिजिटल करन्सीमुळे डिजिटलायझेशनलाही गती येणार आहे.
    सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे काय हे रोख रकमेचे इलेक्ट्रॉनिक रुप आहे. जसे आपण रोख पैसे दऊन व्यवहार करु शकतो, त्याचप्रमाणे डिजिटल करन्सी देऊनही आपल्याला व्यवहार करणे शक्य आहे. सीबीडीसी काही प्रमाणात क्रिप्टो करन्सीप्रमाणेचे काम करते. यात होणारे व्यवहार हे कोणत्याही मध्यस्थाविना म्हणजे बँकांविना होणे शक्य आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही करन्सी तुम्हाला मिळेल, आणि तुम्ही ती ज्याला ट्रान्सफर कराल, त्याच्याकडे जमा होईल. ही करन्सी ना कुठल्या पाकिटात जाणार ना कुठल्या बँक अकाऊंटमध्ये जमा होणार. थोडक्यात रोख रकमेप्रमाणेच या डिजिटल कर्नसीचा वापर करणे शक्य होणार आहे.

     

    डिजिटल रुपया, डिजिटल पेमेंट वेगळे कसे

    सध्या डिजिटल ट्रान्सक्शन, बँक ट्रान्सफर, डिजिटल वॉलेट्स आणि कार्ड पेमेंटने होत असताना या डिजिटल करन्सीची वेगळी गरज का, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मात्र सध्या आपण करत असलेले डिजिटल मेमेंटंस हे चेकप्रमाणे काम करतात. आपण बँकेला आदेश देतो, आणि आपल्या अकाऊंटमध्ये असलेले प्रत्यक्ष रुपयांचे देवाणघेवाण होत असते. यात अनेक संस्था, व्यक्ती सामील असतात. ज्या हे सर्व पूर्ण करतात. उदा. तुम्ही क्रेडिट कार्डवर जर पेमेंट केले तर ते लगेच जमा होत नाही, त्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागतो. थोडक्यात त्याची एक प्रक्रिया असते.  मात्र जेव्हा डिजिटल करन्सीबाबत बोलतो, तेव्हा हे व्यवहार थेट तुमच्यासमोर होतात. तुम्ही पैसे पाठवले की ते लगेच समोरच्याला मिळतात. सध्या होत असलेले डिजटल ट्रान्सक्शन्स हे कुठल्यातरी बँकेत खात्यात जमा असलेल्या रुपयांची देवाणघेवाण असते. मात्र सीबीडीसी करन्सी मात्र नोटांची जागा घेणार आहे.

    डिजिटल रुपया (Digital Rupee) हा क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrncy) किंवा बिट कॅाईनपेक्षा वेगळा कसा

     

    डिजिटल कर्नसीची कल्पना नवी नाही. २००९ साली आलेल्या क्रिप्टो करन्सीच्या बिट कॉईनप्रमाणेच ही कल्पना पुढे आलेली आहे. याच्यासोबतच ईथर, डॉगेकॉईन यासारख्या अनेक क्रिक्पोट करन्सी लाँच झालेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत संपत्ती म्हणून याकडे पाहण्यात येते आहे, आणि अनेक जण त्यात गुंतवणूकही करीत आहेत.
    खासगी क्रिप्टोकरन्सी या खासगी माणसांकडून किंवा कंपन्यांकडून दिल्या जातात. त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची निगराणी नसते. नाव न सांगताही अनेक जण त्यात व्यवहार करु शकतात. त्यामुळे दहशतवादी कारवाया आणि बेकायदेशीर कामांसाठी क्रिप्टो करन्सीचा वापर करण्यात येतो आहे. त्यांना होणत्याची केंद्रीय बँकांचा पाठिंबा नाही. ही करन्सी मर्यादित स्वरुपाची असल्याने, मागणी आणि पुरवठ्यावर याच्या किमती कमी जास्त होतात. एका बिट कॉईनच्या किमतीत ५० टक्क्यांची घटही पाहायला मिळालेली आहे.
    जेव्हा आपण प्रस्तावित डिजिटल रुपयाबाबत बोलतो, तेव्हा त्याला जगभरातील केंद्रीय बँका, म्हणजे आपल्याकडे रिझर्व्ह बँक लाँच करते आहे. यात क्वांटिटीची सीमा नाही आणि आर्थिक स्थिरतेचा यात प्रश्न आहे. एक रुपयाचे नाणे आणि डिजिटल रुपया एकाच किमतीचा राहील. मात्र या डिजिटल कर्नीची देखरेख करणे शक्य होणार आहे. कुणाकडे किती पैसे आहेत, हे रिझर्व्ह बँकेला माहित असेल. रिझर्व्ह बँकेने डिजिटल करन्सी णल्याने क्रिप्टो करन्सी किंवा बिटकॉईनवर फारसा फरक पडणार नाही, से तज्ज्ञांचे मत आहे. क्रिप्टो करन्सी ही आता नवी संपत्ती ठरली आहे. ज्या सध्या जगभरात ट्रेंड आहे, त्यात भारत मागे राहू शकत नाही.

    जगभरात डिजिटल करन्सी वाढण्याचे कारण काय

    डिजिटल करन्सीचे चार मोठे फायदे आहेत.

    ही कमी खर्चिक आहे. याचे व्यवहारही गतीने होतात. त्याच्या तुलनेत चलनातील नोटा यांचा प्रिटिंग खर्च, देवाण घेवाण यातील खर्च अधिक आहे.
    डिजिटल करन्सीला कोओणत्याही बँक खात्याची गरज नाही. हे सर्व व्यवहार ऑफलाईन करणेही शक्य आहे.
    डिजिटल करन्सीवर सरकराची नजर राहणार आहे. त्याचे ट्रॅकिंग करणे शक्य आहे. रोख पैशांच्या बाबतीत हे अशक्य आहे.
    डिजिटल रुपये कधी आणि किती आणायचे हे रिझर्व्ह बँक ठरवणार आहे. त्यामुळे बाजारात रुपये जास्त की कमी हे ठरवता येणार आहे.

    सहा वर्षांच्या अभ्यासानंतर २०२० साली चीनने दोन पायलट प्रोजक्ट सुरु केले. त्यांनी लॉटरी पद्धतीने ई युआन वाटले. २०१२१ पर्यंत २.४ कोटी लोकांनी आणि कंपन्यांनी डिजिटल युआनचे वॉलेट तयार केले होते. चीनमध्ये आत्तापर्यंत ३४५० कोटी डिजिटल युआनचे व्यय़वहार झालेले आहेत. सध्या यांचा अर्थव्यवस्थेतील वाटा ९ टक्के आहे. हे जर यशस्वी ठरले तर जगात डिटिटल करन्सी आणणारा चीन हा जगातील पहिला देश ठरेल. २०२१ च्या एका माहितीनुसार जगातील ८६ टक्के बँका या डिजिटल करन्सीवर काम करीत आहेत. त्यामुळे डिजिटल करन्सी हे लवकरच सत्यात आलेले पाहायला मिळेल.