डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलतर्फे स्त्रियांसाठी मोफत नेत्र तपासणी, वाचा कधी, कुठे, केव्हा कसा घ्यायचाय लाभ

स्त्रिया ज्या विशिष्ट नेत्रविकार व अवस्थांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते आणि ज्या नेत्रविकार व अवस्थांचा प्रचलन दर अलीकडील काळात वाढलेला आहे, त्यांची तपासणी करण्यासाठी रुग्णालयातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई : जगभरात 8 मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, भारतातील सर्वांत मोठ्या नेत्र रुग्णालय नेटवर्क्समध्ये गणना होणाऱ्या डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलतर्फे, 31 मार्च 2023पर्यंत, सर्व शाखांमध्ये, सर्व वयोगटातील स्त्रियांची मोफत नेत्रतपासणी केली जात आहे. नोंदणीसाठी 080-48193434 या क्रमांकावर संपर्क साधा.

स्त्रिया ज्या विशिष्ट नेत्रविकार व अवस्थांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते आणि ज्या नेत्रविकार व अवस्थांचा प्रचलन दर अलीकडील काळात वाढलेला आहे, त्यांची तपासणी करण्यासाठी रुग्णालयातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यांमध्ये दृष्टीवर परिणाम करणारे ऑटोइम्युन विकार, डोळे शुष्क (कोरडे) होणे, दृष्टी कमी होणे, थायरॉइड नेत्रनिकार आणि अपवर्तक दोष (रिफ्रॅक्टिव एरर्स) यांचा समावेश होतो. डॉ. अगरवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सने चेंबूरमध्ये नवीन अत्याधुनिक नेत्र रुग्णालयही सुरू केले आहे.

मुंबईतील चेंबूर येथील डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवा विभागाच्या प्रमुख डॉ. नीता ए. शहा म्हणाल्या, “जीवशास्त्रीय लिंग भेदाचा परिणाम नेत्ररचना, जनुकीय अभिव्यक्ती आणि डोळ्याच्या अन्य कार्यांवर होतो आणि पुढे डोळ्याच्या आरोग्यावरही होतो. गरोदर स्त्रियांमध्ये गर्भारावस्थेतील मधुमेह (जेस्टेशनल डायबिटीस) होऊ शकतो. या अवस्थेत गरोदर स्त्रीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि काहींमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी हा विकार होऊ शकतो. डोळ्यांतील रक्तवाहिन्यांना ईजा झाल्यामुळे दृष्टीत दोष निर्माण होतो. गरोदरपणात डोळे शुष्क होणे आणि प्रकाशाला संवेदनशील होणे यांसारख्या समस्याही येतात. गर्भनिरोधक गोळ्यांमधील हार्मोन्समुळे रक्तवाहिन्यांमध्ये बदल होतात आणि ते बदल अप्रत्यक्षपणे दृष्टी दोषांसाठी कारणीभूत ठरतात.”

रजोनिवृत्ती आणि रजोनिवृत्तीपूर्व काळात शरीर नैसर्गिकरित्या रजोनिवृत्तीकडे वाटचाल करू लागते आणि त्याबरोबरच एस्ट्रोजेन्स या हार्मोन समूहामध्ये घट होते. एस्ट्रोजेन्स घटल्यामुळे डोळ्यातील तैलग्रंथींचा स्राव कमी होतो आणि डोळे शुष्क पडणे तसेच अंधुक दिसणे यांसारख्या तक्रारी निर्माण होतात.

“ऑटोइम्युन समस्यांना तोंड देणाऱ्या रुग्णांमध्ये सुमारे 80% स्त्रिया असतात. त्वचेचा क्षयरोग (ल्युपस), सोरायसिस, रीटर्स सिण्ड्रोम, ऱ्हुमॅटॉइड संधिवात आणि युव्हिटिस हे विकास स्त्रियांना अधिक प्रमाणात होतात. ग्रीव्ह्ज विकार हा एक ऑटोइम्युन आजार असून, यांमध्ये थायरॉइड हार्मोन अतिरिक्त प्रमाणात निर्माण होतो. याचा त्रास पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना अधिक प्रमाणात होतो. थायरॉइड नेत्रविकार 100,000 पैकी 16 स्त्रियांना होतो, तर 100,000 पैकी केवळ 3 पुरुषांना होतो,” असेही डॉ. नीता ए. शहा यांनी सांगितले.

केवळ स्त्रियांनाच होऊ शकणारे नेत्रविकार टाळण्यासाठी स्त्रियांनी काय उपाय केले पाहिजेत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलतर्फे सत्रे घेतली जाणार आहेत. गर्भारावस्था व रजोनिवृत्तीदरम्यान वाढणारे हार्मोन्स आणि ऑटोइम्युन विकारांना बळी पडण्याची शक्यता यांशिवाय आणखीही काही विकारांचा यात समावेश आहे. रुग्णालयाच्या मुंबईभरातील शाखांमध्ये महिनाभर चालणाऱ्या नेत्रतपासणी व जागरूकता अभियानाच्या माध्यमातून स्त्रियांना धोक्यांबाबत सजग केले जाणार आहे, अधिक माहिती दिली जाणार आहे आणि त्यांतून नेत्रविकारांचे निदान वेळेवर होऊन सुरुवातीच्या टप्प्यावर उपचार सुरू करणे शक्य होणार आहे तसेच नेत्रआरोग्याची निष्पत्ती अधिक चांगली राखणेही शक्य होणार आहे.

अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या.