share market down

शेअर बाजारात (Share Market) मागील आठवड्यात अस्थिरता तसेच शेअर बाजारातील मोठ्या पडझडीनंतर आज सोमवारी (Monday) आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात (Share Market)  आशादायी तसेच सकारात्मक चित्र निर्माण होईल, अशी अपेक्षा गुंतवणूकदरांना (Investors) होती. पण शेअर बाजारा सुरु होताच काही मिनिटातच सेन्सेक्समध्ये (Sensex) 1100 अंकाची घसरण पाहयला मिळाली. त्यामुळं गुंतवणूकदार टेन्शनमध्ये आले आहेत.

    मुंबई : शेअर बाजारात (Share Market) मागील आठवड्यात अस्थिरता तसेच शेअर बाजारातील मोठ्या पडझडीनंतर आज सोमवारी (Monday) आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात (Share Market)  आशादायी तसेच सकारात्मक चित्र निर्माण होईल, अशी अपेक्षा गुंतवणूकदरांना (Investors) होती. पण शेअर बाजारा सुरु होताच काही मिनिटातच सेन्सेक्समध्ये (Sensex) 1100 अंकाची घसरण पाहयला मिळाली. त्यामुळं गुंतवणूकदार टेन्शनमध्ये आले आहेत.

    दरम्यान, वाढत्या महागाईचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. सकाळी 9.18 वाजता शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 1331 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. त्यावेळी सेन्सेक्स (Sensex) 52940 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. त्याशिवाय, निफ्टीमध्ये (NIFTY) 385 अंकांची घसरण झाल्याची नोंदी झालेय. आज प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 1100 अंकांनी कोसळला. तर, निफ्टीत 324 अंकांची घसरण दिसून आली. त्यामुळं गुंतवणूकदार (Investors) टेन्शनमध्ये आले असून त्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.

    जागतिक पातळीवर (International Level) सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर (Share Market) दिसून येत आहे. डॉलरच्या (Dollars) तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. काही शेअर वगळता अनेक नामांकित कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत. टाटा मोटर्स, एचडीएफसी, विप्रो, हिंदाल्कोसारख्या कंपन्यांचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक दराने घसरले आहेत. सेन्सेक्समधील टॉप 30 स्टॉक्सपैकी फक्त दोन शेअर्समध्ये खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर, उर्वरित 28 स्टॉकच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं गुंतवणूकदार (Investors) टेन्शनमध्ये आले असून त्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.