
एटीएम फ्री ट्रान्झॅक्शनच्या मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झॅक्शनवरील(ATM Transaction) शुल्क वाढवण्यास रिझर्व्ह बँकेनेही(Reserve Bank Of India) मंजुरी दिली आहे. त्यानुसार एटीएमच्या फ्री लिमिटनंतर केल्या जाणाऱ्या ट्रान्झॅक्शवर १ जानेवारीपासून अधिक शुल्क(Extra Charge For ATM Transaction After Free Limit ) भरावा लागणार आहे.
नवी दिल्ली : नवीन वर्षात एटीएममधून(Atm Transaction) पैसे काढणे महागात पडणार आहे. एटीएममधून ट्रान्झॅक्शनच्या नियमांमध्ये बँक १ जानेवारीपासून बदल(ATM Transaction Rules Change From 1st January 2022) करणार आहे. यामध्ये ट्रान्झॅक्शनच्या शुल्क वाढीचाही समावेश आहे. एटीएम फ्री ट्रान्झॅक्शनच्या मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्क वाढवण्यास रिझर्व्ह बँकेनेही (Reserve Bank Of India) मंजुरी दिली आहे. त्यानुसार एटीएमच्या फ्री लिमिटनंतर केल्या जाणाऱ्या ट्रान्झॅक्शवर १ जानेवारीपासून अधिक शुल्क भरावा लागणार आहे.
नवीन नियमांनुसार ग्राहकांना फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन मर्यादेनंतरच्या ट्रान्झॅक्शनवर २१ रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. सध्या हे शुल्क २० रुपये इतके आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जानेवारी २०२२ पासून बँकांना रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांवर मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्त शुल्क वाढवण्याची परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार, बँकांनी आपल्या ग्राहकांना १ जानेवारी २०२२ पासून २१ रुपये शुल्क आणि जीएसटी भरावे लागतील याची माहिती देणारा एसएमएस पाठवणे सुरू केले आहे.
यावर्षी १ ऑगस्ट २०२१ पासून, रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार ५ रुपयांवरून ६ रुपये केले आहे. जास्त इंटरचेंज फी आणि ऑपरेटिंग कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँकांना ग्राहकांकडून प्रति व्यवहार २१ रुपये शुल्क आकारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बँकांनी शुल्कात वाढ केली आहे.मर्यादित व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर नव्या निर्णयाचा कोणताही परिणाम नाही.
बँकांनी एटीएम व्यवहार शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी, सामान्य ग्राहकांना या निर्णयाची फारशी काळजी करण्याची गरज नाही, कारण या निर्णयाचा परिणाम केवळ मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवरच होणार आहे. बँका त्यांच्या ग्राहकांना एका महिन्यात एटीएममधून आर्थिक आणि गैर-आर्थिक असे पाच मोफत व्यवहार देत राहतील. याशिवाय, महानगरांमध्ये राहणाऱ्या बँक ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएममधून महिन्यातून तीन मोफत आणि छोट्या शहरांमध्ये ५ मोफत व्यवहार करण्याची सुविधाही सुरू राहणार आहे. म्हणजेच मर्यादित व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर नव्या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही.