फ्लिपकार्टने फर्निचर प्रोटेक्शन प्लॅन सादर करत ग्राहकांसाठीच्या इन्शुरन्स उत्पादनांना दिली बळकटी

फ्लिपकार्टने (Flipkart) आपल्या व्यासपीठावर कम्प्लिट फर्निचर प्रोटेक्शन (Complete Furniture Protection) देण्यासाठी कव्हर जीनिअस (Cover Genius) या आघाडीच्या इन्शुअरटेक कंपनीशी भागीदारी केली आहे. एका वर्षात डाग लागणे किंवा नुकसान यासाठीचे संरक्षण आणि तीन वर्षांसाठी अतिरिक्त वॉरंटी या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.

  • ग्राहकांना फर्निचरसाठीचा प्रोटेक्शन प्लॅन १९९ ते १९९९ रु. या दरम्यान प्लॅनची फी भरून घेता येईल
  • यात एका वर्षासाठी डाग आणि अपघाती नुकसानीचे संरक्षण तसेच तीन वर्षांसाठी अतिरिक्त वॉरंटी मिळेल

बंगळुरु : फ्लिपकार्ट (Flipkart) या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स बाजारपेठेने आज ‘कम्प्लिट फर्निचर प्रोटेक्शन’ (Complete Furniture Protection) च्या सादरीकरणाची घोषणा केली. ऑफिस चेअर्स, ऑफिस टेबल्स आणि मॅट्रेसेस अशा या व्यासपीठावरील निवडक फर्निचर उत्पादनांचे अपघाती किंवा डाग पडून झालेले नुकसान कव्हर करण्यासाठी या क्षेत्रात असे उत्पादन पहिल्यांदाच सादर करण्यात आले आहे.

फ्लिपकार्टने (Flipkart) आपल्या व्यासपीठावर कम्प्लिट फर्निचर प्रोटेक्शन (Complete Furniture Protection) देण्यासाठी कव्हर जीनिअस (Cover Genius) या आघाडीच्या इन्शुअरटेक कंपनीशी भागीदारी केली आहे. एका वर्षात डाग लागणे किंवा नुकसान यासाठीचे संरक्षण आणि तीन वर्षांसाठी अतिरिक्त वॉरंटी या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे, उत्पादकाच्या वॉरंटीसह हा काळ सहा वर्षांपर्यंत वाढवताही येऊ शकतो.

या प्लॅनचे दर १९९ रु. ते १९९९ रु. या दरम्यान आहेत. वेगवेगळी उत्पादने आणि त्यांच्या किमतीनुसार हे दर बदलतात. जागतिक कंपनीसोबत फ्लिपकार्टने केलेली धोरणात्मक भागीदारी म्हणजे भारतातील ऑनलाइन फर्निचर क्षेत्रासाठी या उत्पादनांवर मूल्यवर्धित सेवा देऊ करत ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्याच्या उद्देशाने उचललेले पाऊल आहे.

फ्लिपकार्टच्या फिनटेक आणि पेमेंट्स ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज अनेजा म्हणाले, “एक एतद्देशीय कंपनी म्हणून फ्लिपकार्टने नेहमीच ग्राहकांना सर्वोत्कृष्ट मूल्याधारित उत्पादने देण्यात आघाडीवर राहण्याचे उद्दिष्ट राखले आहे. कव्हर जीनिअससोबतची आमची धोरणात्मक भागीदारी भारतीय बाजारपेठेत फर्निचरसाठी परवडणाऱ्या दरातील मूल्यवर्धित सेवा सादर करेल. आमच्या व्यासपीठावर अप्लायन्सेस आणि मोबाइल विभागात अशा अतिरिक्त संरक्षण उत्पादनांना चांगला प्रतिसाद लाभल्याचे आमचे निरिक्षण आहे. आता फर्निचर विभागासाठी ही सेवा सादर केल्याने आमच्या व्यासपीठावर ग्राहकसेवा दर्जा अधिक उंचावेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

फर्निचरप्रमाणेच भविष्यात फ्लिपकार्ट आणि कव्हर जीनिअस अशा मूल्यवर्धित सेवा सातत्याने विविध उत्पादन विभागात सुरू करणार आहेत.