फ्लिपकार्टच्या Big Billion Days मुळे सणांचा आनंद देण्यासाठी लाखो विक्रेते, एमएसएमईज, किराणा आणि बेस्ट ब्रँड्स येणार एकत्र

मागील वर्ष-दीड वर्षात फ्लिपकार्टने (flipkart) एमएसएमईजसाठी एक सहकार्यात्मक आणि लोकशाही पद्धतीची रिटेल परिसंस्था उभारण्यात फार मोठी भूमिका बजावली आहे. यातून एमएसएमईजचा व्यवसाय पुन्हा उभा राहण्यात मदत झाली. निवडीसाठी अधिक पर्याय आणि तंत्रज्ञानाची ताकद प्रत्येकापर्यंत पोहोचवत देशाच्या प्रत्येक भागातील ग्राहकांना किमतीचे योग्य मूल्य मिळवून देण्यात फ्लिपकार्टने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.

  बंगळुरु : फ्लिपकार्ट (Flipkart) या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स (E commerce) बाजारपेठेने घोषणा केली की, द बिग बिलियन डेज (TBBD) या त्यांच्या महत्त्वाच्या आणि सर्वात मोठ्या इव्हेंटचे ८वे पर्व ऑक्टोबर ७ ते १२ २०२१ या काळात सादर करून ते देशातील सणासुदीच्या काळाला सुरुवात करणार आहेत.

  या सहा दिवसांच्या सोहळ्यात लाखो ग्राहक, विक्रेते, छोटे उद्योजक, कारागीर, किराणा, ब्रँड्स आणि ई-कॉमर्स परिसंस्थेतील भागीदार आगामी सणासुदीच्या काळाचा उत्सव सुरू करतील. विशेष म्ह्णजे, नॉन-प्लस ग्राहकांना फ्लिपकार्ट ॲपवर त्यांनी मिळवलेले ५० सुपरकॉईन्स रीडिम करून अर्ली ॲक्सेस मिळवता येईल. या वर्षी, द बिग बिलियन डेजमध्ये देशातील अनेक ब्रँड्स आणि विक्रेत्यांना देशभरातील ग्राहकांसोबत, अगदी महानगरांपासून द्वितीय श्रेणी आणि त्यापुढील शहरांपर्यंत सर्वत्र सणांचा आनंद साजरा करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

  मागील वर्ष-दीड वर्षात फ्लिपकार्टने (flipkart) एमएसएमईजसाठी एक सहकार्यात्मक आणि लोकशाही पद्धतीची रिटेल परिसंस्था उभारण्यात फार मोठी भूमिका बजावली आहे. यातून एमएसएमईजचा व्यवसाय पुन्हा उभा राहण्यात मदत झाली. निवडीसाठी अधिक पर्याय आणि तंत्रज्ञानाची ताकद प्रत्येकापर्यंत पोहोचवत देशाच्या प्रत्येक भागातील ग्राहकांना किमतीचे योग्य मूल्य मिळवून देण्यात फ्लिपकार्टने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. या वर्षीसुद्धा (TBBD) च्या संपूर्णकाळात अनेक नवे लाँच, गेम्स, इंटरॲक्टिव्ह व्हिडिओज, लाइव्ह स्ट्रीम्स आणि रीवॉर्ड्सची धमाल असेल. ग्राहकांना अभूतपूर्व असा खास आणि आकर्षित करून घेणारा खरेदीचा अनुभव इथे मिळेल.

  द बिग बिलियन डेज (TBBD) २०२१ च्या सादरीकरणाची घोषणा करताना फ्लिपकार्ट ग्रूपचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “दरवर्षी, द बिग बिलियन डेज म्हणजे भारतात सणासुदीच्या काळाची नांदी असते आणि दर वेळी आमचे सर्व ग्राहक, विक्रेते आणि ब्रँड भागीदारांना शक्य तितका सर्वोत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आम्ही सज्ज असतो. मागील वर्षात आमच्या परिसंस्थेतील भागीदारांच्या साह्याने आम्ही अशा संधी निर्माण करण्यावर भर दिला ज्यामुळे या आव्हानात्मक काळात ग्राहकांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण होईल आणि त्यातून भारताची आर्थिक प्रगतीची वाटचाल पुन्हा सुरू होईल. ग्राहकांना किमतीचे योग्य मूल्य, एमएसएमईज, विक्रेत्यांना आणि आमच्या लाखो किराणा भागीदारांना प्रगतीच्या संधी आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याची फ्लिपकार्टची बांधिलकी दाखवून देते की मागील दीड वर्षात देशाने कशाप्रकारे ई-कॉमर्सला पसंती दिली आहे आणि द बिग बिलियन डेज (TBBD) म्हणजे समाजाचे ऋण फेडण्याचा आणि देशभरात सणासुदीचा उत्साह निर्माण करण्याचा आमचा एक मार्ग आहे.”

  द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरातील नव्या विक्रेत्यांची भर

  फ्लिपकार्ट सातत्याने आपल्या विक्रेता समुदायाला बळकटी देत आहे आणि डिसेंबर २०२१ पर्यंत आपल्या व्यासपीठावर ४.२ लाख विक्रेते असण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. सध्या फ्लिपकार्ट मार्केटप्लेसवर ३.७५ लाख विक्रेत्यांना डिजिटल कॉमर्सचे साह्य दिले जाते. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्समध्ये असलेल्या क्षमतांमुळे एमएसएमई आणि छोटे व्यावसायिक सातत्याने आकर्षिक होत असल्याने मागील काही महिन्यात या व्यासपीठावर फ्लिपकार्टने ७५००० नवे विक्रेते आणले आहेत. नवे विक्रेते आणि एमएसएमई मुख्यत: आग्रा, इंदूर, जयपूर, पानिपत, राजकोट, सुरत आणि अशा इतर द्वितीय आणि तृतीय श्रेणी बाजारपेठेतील आहेत. फ्लिपकार्ट मार्केटप्लेस व्यासपीठाने जनरल मर्कंडाइज, होम ॲण्ड किचन आणि पर्सनल केअर अशा विभागांमध्ये वाढही अनुभवली आहे. यातील प्रत्येक नव्या विक्रेत्यामध्ये संबंधित परिसंस्थेत अतिरिक्त अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती करण्याची तसेच आर्थिक प्रगतीत हातभार लावणारे क्षेत्र म्हणून ई-कॉमर्सच्या क्षमतांचा लाभ घेण्याच्या क्षमता आहे.

  पुरवठा साखळीची व्यापकता

  फ्लिपकार्टने आपल्या पुरवठा साखळी क्षमतांना लक्षणीय प्रमाणात बळकटी दिली आहे. यात फर्स्ट आणि लास्ट माईल अशा दोन्ही प्रकारच्या डिलिव्हरीजचा समावेश आहे आणि यात विशेषत: देशातील दुर्गम भागांचा समावेश करण्यात आला आहे. देशभरातील ग्राहकांसाठी ई-कॉमर्स आता अधिकाधिक वैयक्तिक बनत असताना ‘किराणा डिलिव्हरी प्रोग्राम’ या उपक्रमाने स्थानिक जनरल ट्रेड स्टोअर्सना डिलिव्हरी भागीदार म्हणून सहभागी होण्यात साह्य केले. यंदा, बरेली (उत्तर प्रदेश), खम्माम (तेलंगणा) आणि जुनागढ (ओदिशा) अशा भागांसह देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून १,००,००० हून अधिक किराणा भागीदार जोडले गेले. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून फ्लिपकार्ट किराणा व्यापारांना सुरक्षित आणि वेळेवर लाखो डिलिव्हरी करण्याच्या दृष्टीने माहिती, तज्ज्ञता, अनुभव आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत साहय केले जाते. मागील तीन वर्षांपासून किराणा डिलिव्हरी प्रोग्राम सातत्याने प्रगती करत आहे आणि आजघडीला फ्लिपकार्टच्या दरमहा डिलिव्हरीजमध्ये त्यांचा एक तृतीयांश वाटा आहे. यातून प्रत्येक डिलिव्हरीचा वेग आणि व्याप्ती वाढवली जात आहे आणि त्याचसोबत किराणा भागीदारांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होत आहे.

  किराणा आणि रिटेल भागीदारांना सणांचा आनंद

  फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय ग्रूपच्या फ्लिपकार्ट होलसेल या डिजिटल बी२बी बाजारपेठेने आपल्या कर्ज पुरवठादार भागीदार आणि फिनटेक संस्थांसोबतच्या भागीदारीतून १.५ दशलक्षांहून अधिक किराणा आणि एमएमईज विविध प्रकारचे कर्ज पर्याय पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करून आपला व्यवसाय वाढवण्यात साह्य होईल.

  या नव्या सुविधांच्या माध्यमातून किराणा दुकानदारांना शून्य व्याजदरावर तात्काळ कर्ज उपलब्ध होते. सहजसोप्या डिजिटल ऑनबोर्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून ३० दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी यात ५ लाखांचे कर्ज मिळू शकते. किराणा भागीदारांना रोख आणि ऑनलाइन ट्रान्सफर तसेच ऑर्डर कॅन्सल झाल्यास तात्काळ रिफंड अशा लवचिक रीपेमेंट पर्यायांचाही लाभ यात मिण्तो. त्याचप्रमाणे क्रेडिट बॅलन्स आणि बिलांवरही लक्ष ठेवता येते. द बिग बिलियन डेजच्या काळात किराणा आणि रिटेलर्सना परवडणाऱ्या दरात खरेदी करता यावी यासाठी ईझीईएमआय तसेच व्यवहारांवर इतर लाभही मिळतात. त्यामुळे ईएमआयवरील व्याजदर आणखी कमी होतो.

  परवडणाऱ्या दरात अधिक उपलब्धता

  फ्लिपकार्टने ॲक्सिक बँक आणि आयसीआयसीआय बँकेसोबतच्या भागीदारीतून क्रेडिट आणि डेबिट कार्डांवर १० टक्के इन्स्टंट डिस्काऊंट देऊ केले आहे. त्याचप्रमाणे पेटीएमच्या माध्यमातून केलेल्या वॉलेट आणि यूपीआय व्यवहारांवर खात्रीशीर कॅशबॅकही आहे. त्यामुळे भारतभरातील ग्राहकांना परडवणारे दर अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. यंदा, ‘फ्लिपकार्ट पे लेटर’वर नव्याने सादर झालेल्या ईएमआय सुविधेमुळे फ्लिपकार्ट ग्राहकांना अधिक सर्वसमावेशक आणि ग्राहककेंद्री खरेदीचा अनुभव मिळू शकेल. यात पात्र ग्राहकांना ७०,००० रु. पर्यंत क्रेडिट लाइन मिळते. ही रक्कम ३,६,९ आणि १२ महिन्यांच्या लवचिक कालावधीत फेडता येते. त्यामुळे ग्राहकांना सणासुदीच्या काळात जास्त रकमेच्या खरेद्या करता येतील. फ्लिपकार्ट आपल्या ब्रँड आणि सेलर पार्टनर्सकडून नो-कॉस्ट ईएमआयचीही सुविधा देऊ करणार आहे. यात ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, एसबीआय आणि अशा १८ बँकांकडून ईएमआयचे पर्याय उपलब्ध असतील.

  फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड पहिल्यांदाच ‘लाईफटाईम फ्री’ ही सुविधा देऊ करत आहे. यात ग्राहकांना ५ टक्के अमर्याद कॅशबॅक आणि अतिरिक्त डिस्काऊंट मिळेल. इतकेच नाही, फ्लिपकार्टने अनेक लॉयल्टी पॉईंट कॅटलॉग्ससोबत भागीदारी केल्याने त्यांच्या ग्राहकांना या सणासुदीच्या काळात उत्तम मूल्यात गिफ्ट कार्ड्सही मिळू शकतील. बिग बिलियन डे थीम असलेलं गिफ्ट कार्ड हे या प्रकारचं पहिलंच उत्पादन आहे. हे कार्ड सेल सुरू होण्याआधीच लाइव्ह होईल आणि ग्राहकांना खरेदी करता येतील तसेच त्यांच्या वॉलेटमध्ये जमा करता येईल.

  ग्राहकांचा सहभाग वृद्धिंगत करणार

  ‘बिग बिलियन डेज (TBBD) स्पेशल्स’ चा भाग म्हणून विविध विभागांमधील लिमिटेड एडिशन उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत. यात मोबाइल, टीव्ही आणि अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज, फॅशन, ब्युटी, फुड, टॉईज, बेबी केअर, होम ॲण्ड किचन, फर्निचर, ग्रोसरी अशा विविध विभागांचा समावेश आहे. प्रत्येक ग्राहकासाठी काहीतरी खास असावे याची खातरजमा म्हणून १०,००० हून अधिक नव्या उत्पादनांच्या समावेशासाठी फ्लिपकार्टने विविध ब्रँडसोबत १०० हून अधिक नव्या भागीदाऱ्या केल्या आहेत.

  यंदा आपल्या व्हिडीओ व्यासपीठावर फ्लिपकार्ट इंटरॲक्टिव्ह शोजच्या माध्यमातून ग्राहकांचा मनोरंजनाचा अनुभव अधिक छान करणार आहे. यात कॉमर्स-लिंक्ड रिवॉर्ड्सही असतील. ‘द बिग बिलियन मुकाबला’ हा एक अनोखा गेमिंग अनुभव असणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना आपल्या कुटुंबिय आणि मित्रमंडळींसोबत खेळण्याची संधी मिळेल.

  यंदाच्या बिग बिलियन डेजमध्ये (TBBD) दर तासाला आकर्षक आणि खास ऑफर्स असतील. विविध विभागांमध्ये लाखो विक्रेते आणि हजारो ब्रँड्स या ऑफर्स देऊ करतील. फ्लिपकार्टवरील प्रत्येक व्हिजिटरला या वर्षी ‘टीबीबीडी शगून’ जिंकण्याची संधी आहे. यातील बक्षिसांमुळे सणासुदीचा काळ अधिक खास होईल. ग्राहकांना या व्यासपीठावर खरेदी करण्यासाठी ‘सुपरकॉईन्स’ वापरता येतील आणि त्यातून अभूतपूर्व डील्ससाठी आणि अतिरिक्त खरेदीसाठी २००० बोनस कॉईन्स जिंकण्यासाठी ‘रिवॉर्ड्स पास’ मिळवता येईल.

  ‘बिग बिलियन डेज (TBBD) धमाल’ ही लाइव्ह स्ट्रीम दररोज एका तासासाठी फ्लिपकार्ट ॲपवर रात्री ८ वाजता लाइव्ह स्ट्रीम केली जाईल. बिग बिलियन डेजच्या एक आठवडा आधीच हे सुरू होईल. यामुळे वापरकर्त्यांना इंटरॲक्टिव्ह अनुभव मिळेल. शिवाय सेलिब्रेटीज आणि इन्फ्लुएन्सर्सच्या साथीने या शोचा भाग म्हणून खरेदी करण्याची आणि विविध रिवॉर्ड्स जिंकण्याचीही संधी मिळेल.

  पहिल्यांदाच (TBBD) सादर केल्याने ग्राहकांना ॲपवर आकर्षक गेम खेळण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना फ्लिपकार्ट ॲपवर विविध टास्क पूर्ण करून त्यांचा ‘सेलिब्रेशन ट्री’ वाढवता येणार आहे. अशा पूर्ण झालेल्या प्रत्येक व्हर्च्युअल ट्रीसाठी फ्लिपकार्ट गिव्हइंडियाच्या साथीने प्रत्यक्षात एक झाड लावेल.

  यंदा फ्लिपकार्टने भारतातील काही लोकप्रिय सेलिब्रेटीजसोबत भागीदारी केली आहे. यात अमिताभ बच्चन, विराट कोहली, आलिया भट, रणबीर कपूर, सुदीप किचा आणि महेश बाबू यांचा समावेश आहे. द बिग बिलियन डेजचा सोहळा साजरा करताना ते अत्यंत सर्जनशील रुपात दिसतील.

  • प्रतिक्षा आता जवळपास संपली आहे! भारतातील खरेदीचा बहुप्रतिक्षित उत्सव सुरू होत आहे ७ ऑक्टोबर रोजी, हा उत्सव १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहील
  • हजारो शहरांमधील ग्राहकांना सणासुदीचा आनंद मिळवून देण्यासाठी १,००,००० हून अधिक किराणा जोडले गेले आहेत
  • आपल्या स्थानिक भाषेत फ्लिपकार्ट ॲप वापरू शकणाऱ्या लाखो ग्राहकांना उत्पादनांची व्यापक श्रेणी उपलब्ध करून देण्यासाठी भारतभरातील ३,७५,००० हून अधिक विक्रेते पुढे आले आहेत.
  • ग्राहकांना ७०,००० रु. पर्यंत क्रेडिटसाठी ‘फ्लिपकार्ट पे लेटर’ नो-कॉस्ट ईएमआय सुविधेचा लाभ घेता येईल, तसेच आघाडीच्या १८ बँका आणि वित्त संस्थांसोबतच्या भागीदारीमुळे ईएमआयचे व्यापक पर्यायही उपलब्ध
  • ग्राहकांना ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डावर १० टक्क्यांपर्यंत तात्काळ सवलत मिळवता येईल आणि पेटीएमच्या माध्यमातून वॉलेट आणि यूपीआयवर खात्रीशीर कॅशबॅकही
  • मोबाइल्स, टीव्ही, अप्लायन्सेस, फॅशन, ब्युटी, होम ॲण्ड किचन, फर्निचर, ग्रोसरी आणि इतर विभागांमध्ये अनोखे आणि अभूतपूर्व पर्याय
  • फ्लिपकार्ट समर्थचे लाखो विक्रेते, कारागीर, विणकर आणि हस्तकलाकार खास उत्पादने सादर करणार
  • अमिताभ बच्चन, आलिया भट, रणबीर कपूर, विराट कोहली, महेश बाबू आणि सुदीप किचा अशा भारतातील मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत भागीदारी करून केलेल्या मोहिमेतून देशभरातील नागरिकांमध्ये सणासुदीचा उत्साह चेतावणार
  • स्पेशल-एडिशन बीडीडी स्पेशल्समध्ये विविध विभागांमधील ब्रँड्ससोबत १०० हून अधिक भागीदाऱ्या, १०००० हून अधिक नवी उत्पादने सादर होणार
  • ब्युटी, जनरल मर्कंडाइज, होम, इलेक्ट्रॉनिक्स आणि लाईफस्टाइल अशा विभागांमध्ये फक्त १ रुपया टोकन ॲडव्हान्स देऊन ग्राहकांना त्यांची उत्पादने प्री-बुक करता येणार
  • या बीबीडीमध्ये १.५ दशलक्षांहून अधिक किराणा आणि रिटेलर्सना फ्लिपकार्ट होलसेलच्या भागीदारीतून आघाडीचे भागीदार आणि फिनटेक संस्थांकडून फक्त दोन मिनिटांत कर्ज मिळवता येणार
  • किराणा दुकानदारांना व्याजमुक्त पद्धतीने १४ दिवसांपर्यंतच्या मुदतीसाठी ५००० ते ३ लाखांपर्यंतचं कर्ज घेता येणार
   १.५ दशलक्ष किराणा आणि रिटेलर्सना फॅशन, ग्रोसरी आणि जनरल मर्कंडाइज आणि इलेक्ट्रॉनिक्स या विभागातील व्यापक उत्पादनांचा ॲक्सेस घरातून किंवा दुकानातून सहज मिळवता येईल