Hero MotoCorp further boosts its premium range with the launch of the new Xpuls 2004V Rally Edition nrvb

हिरो मोटोकॉर्प कंपनीने सांगितले की, बाइक आणि स्कूटरच्या किमतीत वाढ करणे आवश्यक आहे. कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी निरंजन गुप्ता यांनी सांगितले की, मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमतीत वाढ करणे बंधनकारक झाले आहे.

    नवी दिल्ली – पुढील महिन्यापासून हिरो मोटोकॉर्पची वाहन खरेदी महागणार आहे. कंपनीने १ डिसेंबरपासून आपल्या दुचाकींच्या किमतीत १,५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हिरो डिलक्स, स्प्लेंडर, पॅशनसह इतर वाहने महागणार आहेत.

    हिरो मोटोकॉर्प कंपनीने सांगितले की, बाइक आणि स्कूटरच्या किमतीत वाढ करणे आवश्यक आहे. कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी निरंजन गुप्ता यांनी सांगितले की, मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमतीत वाढ करणे बंधनकारक झाले आहे. महागाईमुळे वाहनांच्या विविध घटकांची किंमत वाढली आहे, त्यामुळे त्यांची एकूण निर्मिती खर्च वाढला आहे. त्यामुळेच आम्ही सर्व वाहनांच्या किमती वाढवणार आहोत.

    १ डिसेंबरपासून ही वाहने १,५०० रुपयांनी महागणार आहेत. सर्व वाहनांच्या किमती स्वतंत्रपणे वाढवण्यात येणार आहेत. हिरोची स्प्लेंडर ही अनेक महिन्यांपासून देशात नंबर-१ मोटरसायकल राहिली आहे. हिरोने ऑक्टोबरमध्ये स्प्लेंडरच्या २,६१,७२१ युनिट्सची विक्री केली. यापूर्वी हिरो मोटोकॉर्पने या वर्षी सप्टेंबर महिन्यातही वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या. आत्तापर्यंत, कंपनीने सर्व दुचाकी मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किंमतीत १००० ते ३००० रुपयांची वाढ केली होती.