फ्युचर जेनराली इंडिया इन्शुरन्सतर्फे फ्लॅश मॉब आणि प्राइड परेडसह प्राईड मंथ साजरा, एलजीबीटीक्यूआयए+ समूहाला पाठिंबा

  • सेलिना जेटली आणि सुशांत दिवगीकर यांची कार्यक्रमाला उपस्थिती

मुंबई : फ्युचर जेनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (FGII), ही रिटेल क्षेत्रातील मातब्बर फ्युचर ग्रुप आणि वैश्विक विमा पुरवठादार (Insurance Provider), जेनराली (Generali) यांची संयुक्त कंपनी असून त्यांनी एलजीबीटीक्यूआयए + समुदायाला पाठिंबा देत फ्लॅश मॉब (Flash Mob) आणि प्राइड परेडसह (Pride Parade) त्यांच्या मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू येथील कार्यालयांच्या परिसरात प्राईड मंथ साजरा केला.

 

याप्रसंगी सेलेब्रिटी आणि एलजीबीटीक्यूआयए (LGBTQIA)+ आयकॉन्स सेलिना जेटली (Celina Jaitly) आणि सुशांत दिवगीकर (Sushant Divagikar) हे कार्यक्रमात प्राईड झेंड्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमकदार सप्तरंगी पार्श्वभूमीवर जमले होते. यावेळी फ्युचर जेनरालीची व्यवस्थापन कामकाज पाहणारी मंडळी आणि इतर कर्मचारी वर्गही हजर होता. या विमा कंपनीने अनेक वैविध्यपूर्ण, इक्विटी आणि सर्वसमावेश उपक्रमांद्वारे एलजीबीटीक्यूआयए समुहाला खंबीर पाठबळ दिले आहे. फ्युचर जेनराली प्रणीत कार्यक्रमांचे सबलीकरण करण्यात प्राईड मंथच्या संकल्पनेचा नव्याने प्रवेश झाला आहे.

Future-Generali-India-Insurance

यावेळी एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाचा स्वीकार करण्यासाठी आणि याविषयी सजगता निर्माण करण्याकरिता खास करून तयार करण्यात आलेल्या अंतर्गत आणि सोशल मीडिया अभियानाची सुरुवात करून एफजीआयआयवर प्राईडचा जल्लोष मोठ्या दिमाखाने सादर झाला. या अद्वितीय कार्यक्रमाचा उद्देश प्राईड मंथचे महत्त्व अधोरेखित करण्यासोबतच एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाला जल्लोषाची संधी देणे आणि सदस्यांत आत्मीय भाव निर्माण करण्याचा आहे. फ्लॅश मॉब आणि सेलेब्रिटी संभाषणाद्वारे फ्युचर जेनरालीने आपली अतूट एकजूट तसेच सर्वसमावेशकतेला पाठिंबा देण्याचे काम केले आहे. एफजीआयआय कार्यालयाच्या परिसरात जल्लोष साजरा करण्यासाठी सगळीकडे प्राईड रंगांचा वापर करण्यात आला होता. तसेच कर्मचारी वर्गाने देखील सप्तरंगी कपडे परिधान केले होते. यावेळी धमाल साजरी करण्याच्या अनुषंगाने मर्कंडायजिंग किट ठेवण्यात आले. ज्यामध्ये झेंडे, बॅच व गोड मिठाईचा समावेश होता.

याप्रसंगी बोलताना फ्युचर जेनराली इंडिया इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनुप राऊ म्हणाले, “फ्युचर जेनरालीत आमचा विश्वास वैविध्यपूर्ण, इक्विटी आणि सर्वसमावेशकतेवर आहे. तसेच आम्ही उद्दिष्टासोबत सांगड घातली असून कार्यालयांत आणि आम्ही आरेखित केलेल्या रणनितीत ती दिसून येते. एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाला पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो आणि आमच्या सर्व प्रयत्नांत समानता साजरी करण्याचा आमचा मानस राहील. फ्युचर जेनराली आपल्या सर्व कर्मचारी वर्गाला आणि समस्त जगाला शुभेच्छा देते, प्राईड मंथ सर्वांना आनंदी आणि सक्षमतेचा जावो. देशात सर्वसमावेशकतेचा अंगीकार होवो आणि अपवाद राहू नये.”

 

या जल्लोषादरम्यान लोकप्रिय अभिनेत्री आणि एलजीबीटीक्यूआयए+ हक्कांसाठी आवाज बुलंद करणारी सेलिना जेटली यांनी कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, “लिंग आणि लैंगिकत्वाच्या निवडीत समोरची व्यक्ति जशी आहे, तिच्यासमवेत अगदी सहजतेने व्यवहार करावा. सेलिना जेटली म्हणाली, “आज भारतात एलजीबीटीक्यूआयए+ समुदाय अदृश्य राहिलेला नाही… लोक याविषयी उघडपणे बोलतात, त्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय प्रेम करण्याचे स्वातंत्र्य आहे. मग विषय जातीचा असो, लिंगभेदाचा असो किंवा धर्माचा! आपण सगळेच एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाशी संबंधित असतो किंवा नसतो. त्यांना देखील समाजाकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाशिवाय मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य आहे. आपण स्वत:वर प्रेम करावे आणि आपल्या खऱ्या ओळखीचा शोध घ्यावा, कोणताही पक्षपात किंवा भेद राहू नये अशाप्रकारच्या जगाची कामना करते. हा उद्देश वास्तवात साकारण्यासाठी फ्युचर जेनरालीने राबविलेल्या उपक्रमांचे मी कौतुक करते.”

अभिनेता, नर्तक, गायक, स्तंभकार आणि ड्रॅग क्वीन सुशांत दिवगीकरच्या मते, “ज्या व्यक्ति एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाशी निगडीत आहेत त्यांना आपण या प्रवासात एकटे आहोत असे वाटत नाही. आपल्या सभोवती नजर फिरवा, तुम्हाला समविचारी लोक आढळतील. तुमच्याप्रमाणे ते देखील मनाप्रमाणे आयुष्य जगत असतील. घाबरू नका. जगात जा आणि स्वत:सोबत सच्चे रहा. जर कोणी तुम्हाला माणूस म्हणून हीन वागणूक देत असेल, तर ती त्यांची समस्या आहे, तुमची नव्हे! जग बदलते आहे आणि या बदलत्या विश्वात आपण बजावत असलेल्या भूमिकेचा अभिमान बाळगला पाहिजे. शूर व्हा आणि तुम्हाला जे व्हायचे आहे ते होण्याचा हक्क आहे, हे लक्षात असू द्या.”