दिवाळीला सोने-चांदी झाले स्वस्त! धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर सराफा बाजारात तेजी

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर सराफा बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली. ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढल्याचे यावरून पुन्हाएकदा अधोरेखित झाले. गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोना संकट आहे. मात्र आता झपाट्याने कमी होत असलेली रुग्ण संख्या आणि वाढत्या लसीकरामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम हा बाजारपेठेवर झाला आहे. सोने स्वस्त झाल्याने धनत्रयोदशीचा मुहुर्त साधात अनेकांनी दागिन्यांची खरेदी केली(Gold and Silver Diwali Price).

    दिल्ली : धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर सराफा बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली. ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढल्याचे यावरून पुन्हाएकदा अधोरेखित झाले. गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोना संकट आहे. मात्र आता झपाट्याने कमी होत असलेली रुग्ण संख्या आणि वाढत्या लसीकरामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम हा बाजारपेठेवर झाला आहे. सोने स्वस्त झाल्याने धनत्रयोदशीचा मुहुर्त साधात अनेकांनी दागिन्यांची खरेदी केली(Gold and Silver Diwali Price).

    मंगळवारी सकाळी साडेअकरानंतर सोन खरेदीचा मुहुर्त सुरू झाल्याने, खेरदीसाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली. ही गर्दी बुधवारी दुपारपर्यंत कायम राहाणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

    सोने-चांदी झाले स्वस्त

    मंगळवारी धनत्रयोदशीला सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदविली गेली. स्थानिक बाजारात सोन्याचे दर 64 रुपयाने घसरून 47,839 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहोचले. तर चांदीचे दर 191 रुपयांची कमी होत 64,600 रुपये प्रती किलोवर स्थिरावले. सोमवारी सोने 60 रुपयांनी तर चांदी 120 रुपयांनी स्वस्त झाली होती. तर शुक्रवारी बाजार बंद होताना सोने 354 रुपयांनी कमी होऊन 47607 रुपयांवर स्थिरावले होते. चांदीदेखील 391 रुपयांनी स्वस्त झाली होती. चांदीचा भाव 64540 रुपयांवर स्थिरावला होता.

    100 ते 150 टन सोन्याची विक्री

    एका सर्वेक्षणानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी भारतामध्ये तब्बल 100 ते 150 टन सोन्याची विक्री होते. मात्र गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने सोन्याच्या विक्रीमध्ये लक्षणीय घट झाली होती. गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर केवळ 40 ते 50 टन सोन्याचीच विक्री झाली. मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पुन्हा एकदा विक्रीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी सुर्वण विक्री ही 2019 च्या पातळीवर राहाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

    दरम्यान, तामिळनाडू सरकारने एक आदेश जारी केला आणि सुमारे 6,000 कोटी रुपयांचे सहकारी सोने कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी काही अटींसह पाच सॉवरेनपर्यंतचे सोने कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्याची एकूण किंमत सुमारे 6,000 कोटी रुपये असेल. सहकार, अन्न आणि ग्राहक संरक्षण विभागाने 1 नोव्हेंबर रोजी या संदर्भात आदेश जारी केला आहे.