सोन्याचा भाव वधारला, चांदीच्या दरातही तेजी, जाणून घ्या आजची किंमत

दिल्लीमध्ये शुक्रवारी सोन्याच्या बाजार (Gold And Silver price Today) ९३ रुपयांच्या वाढीसह बंद झाला. गुरुवारच्या तुलनेत प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव (Gold rate today) ९३ रुपयांनी वधारला. सोन्याचा भाव ४६,९१२ रुपयांवर पोहोचला आहे.

    नवी दिल्ली : सोन्याच्या भावात (Gold price) शुक्रवारी तेजी दिसून आली आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी सोन्याच्या बाजार ९३ रुपयांच्या वाढीसह बंद झाला. गुरुवारच्या तुलनेत प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव (Gold rate today) ९३ रुपयांनी वधारला. सोन्याचा भाव ४६,९१२ रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील (Gold price in Delhi) तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. सोन्यासोबत चांदीच्या भावातही तेजीचं चित्र दिसून आलं. आज चांदीच्या भावात ५९ रुपयांची वाढ दिसून आली. प्रति किलो चांदींचा भाव ६१,००५ रुपयांवर पोहोचला. काल (गुरुवारी) चांदीचा भाव ६०,९४६ रुपये प्रति किलो नोंदविला गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव १,८२६ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव २३.१९ डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिला.

    मुंबईत सोन्याच्या भावात घसरण नोंदविली गेली. २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा १२० रुपयांची घसरण झाली. प्रति तोळा सोन्याचा भाव ४९,१०० वरुन ४८,९८० वर पोहोचला. पुण्यात देखील सोन्याच्या भावात तीन अंकी वाढ नोंदविली गेली. २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा १९० रुपयांची वाढ झाली. प्रति तोळा सोन्याचा भाव ४८,८४० वरुन ४९,०३० वर पोहोचला.