सणांच्या महिन्यात सोन्या – चांदीच्या दरात वाढ

सोन्याचे फ्युचर्स ०.३४ टक्क्यांनी वाढून २४ कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today) ५२,०७० रूपयांवर पोहोचला आहे. तर १ किलो चांदीचा दर (Silver Price Today)  ५८,२०० रूपयांवर पोहोचला आहे.

  ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण आहेत. त्यामुळे ग्राहकांचा बाजारात सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदी करण्याचा कल वाढला आहे. गेल्या आठवड्यात कमी झालेले सोन्याचे दर या आठवड्यात पुन्हा वाढल्याचे समोर आले आहे. सोन्याचे फ्युचर्स ०.३४ टक्क्यांनी वाढून २४ कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today) ५२,०७० रूपयांवर पोहोचला आहे. तर १ किलो चांदीचा दर (Silver Price Today)  ५८,२०० रूपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या कुठे आणि किती दर आहे याची माहिती पुढे दिली आहे.

  तुमच्या शहरातील सोन्याचे आणि चांदीचे आजचे दर :
  मुंबई – ४७,७३१ ,५८,२००
  पुणे – ४७,७३१, ५८,२००
  नाशिक – ४७,७३१, ५८,२००
  नागपूर – ४७,७३१, ५८,२००
  दिल्ली – ४७,६४८, ५८,१००
  कोलकाता – ४७,६६७, ५८,१३०