gold and silver

सोने-चांदीच्या दरामध्ये गेल्या आठवड्यात अस्थिरता दिसून आली. (Gold And Silver Price Today) मात्र या आठवड्याची सुरूवात चांगली झाली. सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.

  मुंबई: सध्या लग्नसराई सुरु झाली आहे. त्यामुळे सोने- चांदी खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. (Gold-Silver Rate)  सोने-चांदीच्या दरामध्ये गेल्या आठवड्यात अस्थिरता दिसून आली. (Gold And Silver Price Today) मात्र या आठवड्याची सुरूवात चांगली झाली. सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.

  आज राज्यात २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ४८,३५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ५२,७५० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ६१,२०० रुपये आहे.

  • विविध शहरांमधले २२ कॅरेट सोन्याचे आणि चांदीचे दर
   नवी दिल्ली – सोने -४८,५०० रुपये १० ग्रॅम, चांदी ६१,२०० रुपये प्रति किलो
   मुंबई – सोने-  ४८३५० रुपये प्रति १० ग्रॅम, ६१,२०० रुपये प्रति किलो
   कोलकत्ता – ४८,३५० रुपये प्रति १० ग्रॅम, ६१,२०० रुपये प्रति किलो
   चेन्नई – ४९,०५० रुपये प्रति १० ग्रॅम, ६७,००० रुपये प्रति किलो

  २२ आणि २४ कॅरेटमधला फरक
  सराफा बाजारात २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध आहे. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे ९% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. मिळालेल्या माहितीनुसार २४ कॅरेट सोने चमकदार असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

  सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता तपासून पाहणे आवश्यक आहे. हॉलमार्क चिन्ह पाहूनच सोन्याच्या वस्तू खरेदी करायला हव्यात. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते.