सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा एकदा घसरल्या, जाणून घ्या आजचे दर?

एमसीएक्सवर सोन्याचे वायदा दर प्रति १० ग्रॅम ०.२४ टक्क्यांनी घसरून ४४ हजार ७९५ वर, तर चांदी ०.५ टक्के खाली घसरून ६६ हजार १३ प्रती किलो झाली. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर ०.१८ टक्के तर चांदी १.६ टक्के खाली घसरली. दिल्ली सराफा बाजारात आज मंगळवारी २२ कॅरेट सोन्याचे भाव प्रति १०० ग्रॅम ४,३८,००० रुपये आणि दिल्ली सराफा बाजारात प्रति १० ग्रॅम ४३,८०० रुपये आहेत. त्याचबरोबर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १०० ग्रॅम ४,४७,९५० रुपये आणि प्रति १० ग्रॅम ४४,७९५ रुपये आहे.

    नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आज सोन्याच्या किंमती १०० ग्रॅम प्रति १२०० रूपयांनी कमी झाले असून प्रति १० ग्रॅम १२० रूपयांपर्यंत कमकुवत झालेल्या जागतिक निर्देशांदरम्यान भारतात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमती खाल्या आल्या.

    एमसीएक्सवर सोन्याचे वायदा दर प्रति १० ग्रॅम ०.२४ टक्क्यांनी घसरून ४४ हजार ७९५ वर, तर चांदी ०.५ टक्के खाली घसरून ६६ हजार १३ प्रती किलो झाली. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर ०.१८ टक्के तर चांदी १.६ टक्के खाली घसरली. दिल्ली सराफा बाजारात आज मंगळवारी २२ कॅरेट सोन्याचे भाव प्रति १०० ग्रॅम ४,३८,००० रुपये आणि दिल्ली सराफा बाजारात प्रति १० ग्रॅम ४३,८०० रुपये आहेत. त्याचबरोबर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १०० ग्रॅम ४,४७,९५० रुपये आणि प्रति १० ग्रॅम ४४,७९५ रुपये आहे.

    सराफा बाजारात चांदीचा दर आज ६६ हजार १३ रुपये प्रतिकिलोवर आला. सोमवारी चांदीच्या किंमती १.६ टक्क्यांनी घसरल्या. तसेच अन्य मौल्यवान धातूंमध्ये चांदी ०.६ टक्क्यांनी घसरून २५.६१ डॉलर आणि प्लॅटिनम ०.३ टक्क्यांनी खाली घसरून१,१७९.५९ डॉलरवर बंद झाली.