सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा भाव

सोन्याचा दर(Gold Prize) मागील वर्षाच्या सर्वोच्च स्तरावरुन १०००० रुपयांनी कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव एक आठवड्याच्या निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे.

    नवी दिल्ली : आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात(Gold Prize) घसरण झाली आहे. कमकुवत जागतिक निर्देशांदरम्यान भारतीय बाजारात सोनं स्वस्त झालं आहे. सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा भाव ०.१ टक्क्यांच्या घसरणीसह दोन महिन्यांच्या निच्चांकी ४६,९७० प्रति १० ग्रॅमवर आहे. तर चांदीचा भाव ०.२६ टक्क्यांनी वधारला असून ६८,०४९ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. भारतात सोन्याचा दर मागील वर्षाच्या सर्वोच्च स्तरावरुन १०००० रुपयांनी कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव एक आठवड्याच्या निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे.

    राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट गोल्ड रेट ५०३२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. त्याशिवाय चेन्नईत ४८५१० रुपये, मुंबईत ४७१७० रुपये, कोलकातामध्ये ४९२३० रुपये, बंगळुरूमध्ये ४८१२० रुपये, हैदराबादमध्ये ४८१२० रुपये, जयपुरमध्ये ५०३२० रुपये, लखनऊमध्ये ५०३२० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

    जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाअखेरीस सोन्याचा दर मागील वर्षाचा रेकॉर्ड मोडत ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहचू शकतो असा अंदाज आहे. परंतु या मधल्या काळात अनेक चढ-उतार पाहायला मिळू शकतात. अशात गुंतवणुकदार ६ महिन्यांच्या काळात आणि स्टॉपलॉससह नफा कमावू शकतात.

    सोन्यातील गुंतवणुकीबाबत बोलताना जाणकारांनी सांगितलं, की मागील वर्षापासून सोन्याने २८ टक्के रिटर्न दिले आहेत. त्या आधीच्या वर्षातही सोन्याचे रिटर्न जवळपास २५ टक्के होते. जर दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल, तर सोनं गुंतवणुकीसाठी अतिशय चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.