gold

लग्नाचा हंगाम सुरु आहे.(gold and silver prize today) त्यामुळे आता पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे.

    लग्नाचा हंगाम सुरु आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत सोन्याचा दर (Gold rate today) १२००० ने स्वस्त झाला आहे.  आता पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. आज सोन्याचे दर १२० रुपयांनी वाढले आहेत. आज सकाळी MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १२ रुपयांची वाढ झाली आहे. आज भारतात २२ कॅरेट सोन्याचे दर ४३,९६० रुपये प्रति तोळा आहे.

    तज्ज्ञांच्या मते पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. भारतात लग्नसराईच्या काळात सोन आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. सोन्याच्या दरात ६३,००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

    आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. . अमेरिकेत सोन्याचे दर ०.१४ डॉलरने वाढून १,७२७.२२ डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर चांदीचे दर ०.०९ डॉलरच्या तेजीमुळे २६.०२ डॉलर झाले आहेत.