गेल्या दहा दिवसांपासून कमी होताहेत सोन्याचे भाव; सध्या दर पोहोचले…

गेल्या काही दिवसांमध्ये भारतात सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) प्रचंड तेजी दिसून येत होती. काही दिवसांपूर्वीच सोन्याचा भाव हा तब्बल 74,000 रुपये प्रतितोळा एवढा झाला होता. मात्र, गेल्या दहा दिवसांमध्ये या किंमती पुन्हा झपाट्याने खाली आल्याचे दिसत आहे.

    नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये भारतात सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) प्रचंड तेजी दिसून येत होती. काही दिवसांपूर्वीच सोन्याचा भाव हा तब्बल 74,000 रुपये प्रतितोळा एवढा झाला होता. मात्र, गेल्या दहा दिवसांमध्ये या किंमती पुन्हा झपाट्याने खाली आल्याचे दिसत आहे. वायदे बाजारात (एमसीएक्स) सोने सुमारे 2,500 रुपयांनी स्वस्त झाल्याचे दिसत आहे.

    आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत 71,486 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती. 5 जूनच्या वायद्यासाठी सोन्याची किंमत ही गेल्या दहा दिवसांमध्ये भरपूर कमी झाली आहे. 16 एप्रिल रोजी सोन्याची किंमत ही सुमारे 74,000 प्रतितोळा एवढी होती, जी आता कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किंमती सुमारे 4 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

    चांदीच्या किंमतीही घसरल्या

    एमसीएक्सवर केवळ सोनेच नाही, तर चांदीच्या किंमतीमध्ये देखील मोठी घट झाल्याचे दिसत आहे. 16 जून रोजी चांदीची किंमत 85,000 रुपये किलो एवढी होती, जी आता कमी होऊन 82,500 एवढी झाली आहे.

    अशी आहेत कारणे

    गेल्या काही दिवसांमध्ये इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध होण्याची शक्यता कमी झाली आहे. यामुळे गुंतवणुकदार रिलॅक्स झाले असून, सोन्याची खरेदी देखील कमी झाली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांमध्ये या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सोने हे सुमारे 70 हजार रुपये प्रतितोळा एवढे खाली घसरेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.