कोरोना काळात सोने झाले १० हजारांनी स्वस्त; दिल्ली, मुंबईसह तपासा आपल्या शहरांतील आजचे दर

या वाढीसह, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ४६,१९० रुपये आहे. प्रति १० ग्रॅम सोन्याच्या २४ कॅरेटची किंमत ४७,१९० रुपये आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या दरानुसार गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती खालच्या पातळीवर राहिल्यानंतर वाढू लागल्या आहेत. सोन्यावर वेगवेगळ्या करामुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात सोन्याचे दर वेगवेगळे आहेत.

  नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून सोन्याच्या किंमतींमध्ये निरंतर घट झाली आहे. यासह सोन्याची किंमत गेल्या दोन महिन्यांच्या सर्वात खालच्या पातळीवर आहे. सलग घट झाल्यानंतर शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम ४० रुपयांनी वाढ झाली.

  या वाढीसह, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ४६,१९० रुपये आहे. प्रति १० ग्रॅम सोन्याच्या २४ कॅरेटची किंमत ४७,१९० रुपये आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या दरानुसार गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती खालच्या पातळीवर राहिल्यानंतर वाढू लागल्या आहेत. सोन्यावर वेगवेगळ्या करामुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात सोन्याचे दर वेगवेगळे आहेत.

  MCX वर किती आहे सोन्याची किंमत?

  शुक्रवारी भारतात सोन्याच्या किंमतींमध्ये सपाट ट्रेडिंग होते आहे. कारण अमेरिकन चलनवाढीच्या आकडेवारीपेक्षा पिवळ्या धातूचे दर स्थिर राहिले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याचा ऑगस्ट फ्यूचर्स ४१ रुपये किंवा ०.०९ टक्क्यांनी वाढून ४६,९११ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेडिंग करीत आहे. तर मागील सत्रांत बंदच्या तुलनेत ते ४६८७० रुपये होते. चांदी जुलै फ्यूचर्स ६७,८९४ रुपये प्रतिकिलो, १६१ रुपयांवर ट्रेडिंग करीत आहेत. मागील सत्रात चांदीचा वायदा दर प्रति किलो ६७,७३३ रुपयांवर बंद झाला होता. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन सोन्याचा वायदा ०.२% ने कमी होऊन ते १,७७३.६० डॉलर प्रति औंस झाले.

  उच्चांकावरुन सुमारे १०,००० रुपयांनी स्वस्त सोनं

  मागील वर्षी, कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती, ऑगस्ट २०२० मध्ये, MCX वर प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ५६१९१ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. आज ऑगस्ट फ्युचर्स MCX ला सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४६,९११ रुपयांच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही १०,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

  दिल्ली, मुंबईसह या शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

  गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईतील २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,१९० रुपये आहे आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,१९० रुपये आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४४,४०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४८,४४० रुपये आहेत. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४६,१५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५०,२५० रुपयांवर उपलब्ध आहेत.

  कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६६० रुपयांवर पोहोचली आहे आणि २४ कॅरेटची किंमत प्रति १० ग्रॅम ४९,२१० रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे बंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४४,००० रुपये आहे आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,००० रुपये आहे. हैदराबादमध्ये सोन्याच्या किंमती २२ कॅरेटच्या १० ग्रॅम प्रति ४४,००० आणि २४ कॅरेटच्या १० ग्रॅम प्रति ४८,००० रुपये आहेत.

  Gold Rate Today gold is getting cheaper by rs 10000 quickly check the rates of your cities including delhi mumbai