आनंदाची बातमी! सेवानिवृत्ती वेतनात होणार घसघशीत वाढ; खासगी कंपनीत नोकरदार वर्गासाठी खास बातमी

    सेवानिवृत्ती धारकांनासाठी मोठी बातमी तसेच खासगी कंपनीत नोकरदार असलेल्या कर्मचारऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुमचा पीएफ (EPFO ) कापला जात असेल तर या काही गोष्टी जाणून घ्या. EPS (कर्मचारी पेन्शन योजना-1995) अंतर्गत वेतनधारक वर्गास मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी मागच्या काही वर्षापासून होत आहे. याबाबत नवी माहिती पुढे आली आहे. इपीएस अंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ व्हावी यासाठी ‘EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती’ने कामगार मंत्रालयाला एक 15 दिवसांचीनोटीस दिली आहे. या नोटीशीमध्ये किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयांवरून 7,500 रुपये करण्यात यावी असे म्हटले आहे.

    कामगार मंत्रालयाने समितीची मागणी मान्य करावी अन्यथा देशव्यापी आंदोलन उभारण्यात येईल. जे सरकारला भविष्यात भारी पडेल असा इशाराच समितीने दिला आहे. EPS-95ही सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे चालवली जाते. जिचे सहा कोटींहून अधिक भागधारक आणि 75 लाख पेन्शनधारक लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.