Great blow to Mukesh Ambani! Gautam Adani became the richest businessman in Asia

अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी हे आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती झाले आहेत. त्यांनी एकूण संपत्तीच्या वाटचालीत मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. पहिल्यांदाच गौतम अदीनी यांनी हा मान पटकावला आहे(Great blow to Mukesh Ambani! Gautam Adani became the richest businessman in Asia).

  मुंबई : अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी हे आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती झाले आहेत. त्यांनी एकूण संपत्तीच्या वाटचालीत मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. पहिल्यांदाच गौतम अदीनी यांनी हा मान पटकावला आहे(Great blow to Mukesh Ambani! Gautam Adani became the richest businessman in Asia).

  बुधवारी अदानी यांच्या सर्व फर्म आणि मालमत्तांचे एकूण बाजार मूल्य १० लाख कोटी रुपये झाले. तर रिलायन्स इंटस्ट्रीजची मार्केट कॅप १४.९१ लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे. मार्केट कॅपचा विचार केल्यास रिलायन्स पुढे आहे, मात्र अदानी यांची त्यांच्या कंपन्यांतील भागिदारी ही अंबानींच्या तुलनेत जास्त आहे, म्हणजेच त्यांचे शेअर्स अंबानींच्या तुलनेत त्यांच्या मालकीच्या कंपन्यांत जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे अदानी हे अंबानींपेक्षा श्रीमंत झाले आहेत.

  साऊदी अरामकोशी करार तुटल्याने रिलायन्स पिछाडीवर

  साऊदी अरामकोशी रिलायन्स कंपनीचा १५ अब्ज कोटींचा करार तुटल्याने, रिलायन्सच्या शेअर्सची सातत्याने घसरण सुरु आहे. ही घसरण बुधवारीही सुरु राहिली. बुधवारी एनएसईत रिलायन्सचा शेअर १.४८ टक्क्यांनी घसरुन २३५०.९० रुपयांवर बंद झाला. यामुळे गुंतवणूकदारांचे २२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुकेश अंबानी यांना ११ हजार कोटींचा फटका बसला आहे.

  रिलायन्स अद्यापही विश्वासार्ह कंपनी

  सातत्याने शेर बाजारात घसरणीनंतरही रिलायन्सचे बाजारातील भांडवल हे १४.९१ लाख कोटींवर पोहचले आहे. अद्यापही देशातील रिलायन्स ही सर्वाधिक विश्वासार्ह कंपनी आहे.

  अदानी यांच्या मार्केट कॅपमध्ये ४२५० कोटींची वाढ

  अदानी ग्रुप्सच्या कंपन्यांच्या ग्रॉस मार्केट कॅपमध्ये बुधवारी १२ हजार कोटी रुपयांची तर नेट मार्केट कॅपमध्ये ४२५० कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे अदानी हे अशिया खँडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती झाले आहेत. बुधवारी अदानी एंटरप्रायजेझचा शेअर २.७६ टक्क्यांच्या वाढीने १७५४.६५ रुपयांवर बंद झाला.