१ जूनपासून सोने विक्रीवर हॉलमार्क असणार बंधनकारक , बीआयएसकडून अधिसूचना जारी

सोन्याची शुद्धता आता तीन दर्जांमध्ये राहणार आहे. यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही फायदा होणार आहे. दर्जाबद्दल या दोघांच्याही मनात शंका राहणार नाही. सोन्यासाठी हॉलमार्किंग ही त्याच्या शुद्धतेची ओळख आहे, पण सध्या हॉलमार्क अनिवार्य नाहीये. याआधी याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२१ होती. सराफ संघटनेच्या मागणीवरून ही वाढवून १ जून २०२१ केली गेली आहे.

    सोने-चांदीच्या किंमतीत मागील काही दिवसांपासून घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी (gold jewelry) हॉलमार्क (hallmark) अनिवार्य केले आहे. १ जून २०२१ पासून हॉलमार्क नसलेले सोने विकता येणार नाहीये. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच बीआयएसने अधिसूचना जारी करत सर्व सराफांना याची माहिती दिली आहे.

    सोन्याची शुद्धता आता तीन दर्जांमध्ये राहणार आहे. यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही फायदा होणार आहे. दर्जाबद्दल या दोघांच्याही मनात शंका राहणार नाही. सोन्यासाठी हॉलमार्किंग ही त्याच्या शुद्धतेची ओळख आहे, पण सध्या हॉलमार्क अनिवार्य नाहीये. याआधी याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२१ होती. सराफ संघटनेच्या मागणीवरून ही वाढवून १ जून २०२१ केली गेली आहे.

    भारत खूप मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो आणि वापरही करतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारत दरवर्षी साधारण ७००-८०० टन सोन्याची आयात करतो. दागिन्यांचे हॉलमार्किंग करण्याच्या प्रक्रियेत सराफ बीआयएसच्या ए अँड एच केंद्रावर दागिने जमा करतात आणि तिथे त्यांच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते.