
आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सामान्यांना दिलासा दिला आहे. करांबाबात अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पाहूया नेमका कशा प्रकारे भरावा लागणार वार्षिक कर? तुमचं उत्पन्न किती? आणि तुमचा कर किती? अर्थसंकल्पातील घोषणेनंतर तुम्हांला आता किती भरावा लागणार कर, पाहूयात नवीन कर प्रणाली...
नवी दिल्ली– आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करताना सामान्यांना, नोकरदारांना, कामगारांना, कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची व मोठी घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महागाई, बेरोजगारी, सतत इंधनाचे वाढत जाणारे भाव आदी आव्हानं सरकारसमोर असताना, आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सामान्यांना दिलासा दिला आहे. करांबाबात अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पाहूया नेमका कशा प्रकारे भरावा लागणार वार्षिक कर? तुमचं उत्पन्न किती? आणि तुमचा कर किती? अर्थसंकल्पातील घोषणेनंतर तुम्हांला आता किती भरावा लागणार कर, पाहूयात नवीन कर प्रणाली…
७ लाखांपर्यंत कर नाही
दरम्यान, जीवनाचा भाग म्हणजे वार्षिक उत्पन्नातील वैयक्तिक कर याबाबत अर्थमंत्र्यांनी मोठा व लोकांच्या हिताच्या निर्णय घेतला आहे. आता सात लाखांपर्य़ंत ज्यांचे वार्षिक उत्पन्न आहे, त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही, त्यामुळं नोकरदार, कामगार, कर्मचारी आदींना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ७ लाख उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर नाही. तर ९ लाख उत्पन्नासाठी ४४ हजार रुपये कर भरावा लागणार आहे. तसेच स्टँडर्ड डिडक्शन १५.५ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ५२ हजार सरचार्ज ३७ टक्क्यांवरुन २५ टक्के असेल.
तुमचा पगार किती? किती भरावा लागणार कर…
सध्या ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. ज्यांचे उत्पन्न 2.50 ते 5 लाख रुपये आहे, त्यांना 5 टक्के दराने म्हणजेच 12500 रुपये कर भरावा लागतो. प्राप्तिकराच्या नियम 87A अंतर्गत, सरकार 12,500 रुपयांची कर सवलत देते. करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षाही अधिक आहे, त्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही. अशा लोकांना केवळ महागाई, आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर वाढलेला ईएमआय आदीमुळे खिशावर अधिकच ताण येतो.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात टॅक्स स्लॅबबाबत घोषणा केली. आता, सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.
उत्पन्न | प्राप्तिकर |
0 ते तीन लाख | 0 टक्के |
3 ते 6 लाख | 5 टक्के |
6 ते 9 लाख | 10 टक्के |
9 ते 12 लाख | 15 टक्के |
12 ते 15 लाख | 20 टक्के |
15 लाख हून अधिक | 30 टक्के |
पूर्वी 5 लाखांपर्यंत होता वार्षिक कर…
आजच्या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी रेल्वेसाठी, शेतीसाठी तसेच अन्य महत्वाच्या व मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान, सर्वांच्या आयकरांची मर्यांदा यापूर्वी पाच लाखांपर्यत होती, म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाख असेल तर तुम्हाला कर भरावा लागयाचा, पण आता तुम्हाला ही मर्यादा सात लाखापर्यत गेली आहे, त्यामुळं नोकरदार, कामगार, कर्मचारी आदींना मोठा दिलासा मिळाला आहे.