सोने खरेदीसाठी उत्तम संधी; अडीच महिन्यांतील दर निचांकी पातळीवर

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १४ एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात इतकी घसरण झालेली आहे. १४ एप्रिल रोजी MCX वर सोन्याचा बाजार बंद होतानाचा भाव प्रतितोळा ४६८३१ रुपये इतका होता. तर १५ एप्रिलला हाच दर प्रतितोळा ४७४०१ रुपये इतका होता.

  मुंबई : गेल्या काही काळापासून चढे असलेले सोन्याचे दर आता काहीसे स्थिरावताना दिसत आहेत. या आठवड्यात सोन्याच्या दरात (Gold Rate) अनेक चढउतार पाहायला मिळाले. शुक्रवारी बाजार बंद होताना मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याच्या दरात ८६ रुपयांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर ४६९५६ रुपये इतका झाला होता. (Gold rates in MCX market)

  मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १४ एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात इतकी घसरण झालेली आहे. १४ एप्रिल रोजी MCX वर सोन्याचा बाजार बंद होतानाचा भाव प्रतितोळा ४६८३१ रुपये इतका होता. तर १५ एप्रिलला हाच दर प्रतितोळा ४७४०१ रुपये इतका होता. या हिशेबाने सोन्याचे दर सध्या अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

  आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वधारल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेची फेडरल बँक व्याजदर वाढवू शकते. त्याचाही परिणाम भारतीय भांडवली बाजारावर आणि सोन्याच्या दरांवर पाहायला मिळू शकतो.

  भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

  कोरोना संकटामुळे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रोडावली असताना परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याने देशाला मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. १८ जूनला परकीय चलन गंगाजळी ४.१४८ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन ६०३.९३३ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.

  परकीय मुद्रा भांडारातील युरो, पाऊंड आणि येनच्या या परकीय चलनांच्या विनिमय दरात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. यापूर्वी ४ जून रोजी Forex Reserves वाढ पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळातही परकीय गुंतवणुकदारांनी भारतावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी ६०० अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली होती.

  in commodity market gold and silver rates downfall