मध्यमवर्गीयांना आयकरात सूट, मोबाईल-गाड्या स्वस्त, शेतकऱ्यांनाही आमिष, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं 2024 लोकसभा निवडणुकांपूर्वीचं ‘इलेक्शन बजेट’?, घ्या जाणून

देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत जाहीर केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय योजानांचा समावेश आहे. विद्यमान सरकारचे हे शेवटचे बजेट आहे

  देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत जाहीर केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय योजानांचा समावेश आहे. विद्यमान सरकारचे हे शेवटचे बजेट आहे. निवडणूक वर्षाआधी मध्यमवर्ग, छोटे शेतकरी आणि ग्रामीण लोकसंख्येला सुखावणारा असा हा अर्थसंकल्प आहे. हे इलेक्शन बजेट आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना देण्यात आलेल्या सवलतीचा निवडणुकीशी संबंध आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे

  7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, बजेटमध्ये करदात्यांना मोठा दिलासा

  सर्वसामान्यांच्या इन्कम टॅक्ससंदर्भात (Income Tax) मोठी घोषणा बजेटमध्ये करण्यात आलीय. ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय. नव्या कररचनेनुसार हे उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय. मध्यमवर्गीयांसाठी इन्कमटॅक्समध्ये मोठी सूट मिळालीय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी ही घोषणा केलीय.

  शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
  देशातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल् आहेत. यंदाच्या बजेटमध्ये (Budget 2023) केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. श्री अन्न योजना सुरू करण्यात आली असून कृषी क्षेत्रासाठी भांडार क्षमता वाढवणार आहोत. तर इंडियन मिलेट्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली जाईल. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार सुरु करण्यात येणार असून विकास क्लस्टरही योजनाही राबवली जाणार आहे. तसंच शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

  मोदी सरकारने रेल्वेला काय दिलं

  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 2023-24 साठी अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला असून काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी (Railway Budget) 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद जाहीर केली आहे. 2013-14 च्या तुलनेत ही तरतूद नऊ पटींनी अधिक आहे.

  देशातील महिलांसाठी खुशखबर

  अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटची घोषणा करण्यात आले. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करुन दिले जाणार. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करुन दिले जाईल. 2 लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असेल. तसेच देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने नवीन योजना आखली आहे. यामध्ये सरकारने देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवीन योजना आखल्या असून यामध्ये आत्मनिर्भर भारताचा प्रचारही करण्यात आला आहे. 81 लाख महिला बचतगटांचे सबलीकरण करण्यात येणार आहे. तसेच 28 महिने 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येणार आहे.

  प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार

  पीएम आवास योजनेसाठी सरकारने भरीव तरतूद केली आहे. जे नागरीक अद्याप हक्काचं घर घेवू शकले नाहीत. त्यांना या योजनेचा निश्चित फायदा होणार. अर्थसंकल्पात पीेएम योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आल्यामुळे अधिका अधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सध्या शहरी तसेच ग्रामी भागात हजारो नागरिक पीएम आवास योजनेचा लाभ घेत आहेत.

  सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय असा हा अर्थसंकल्प (Budget) असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिलीय. तर पायाभूत सुविधांसाठी उत्तम अर्थसंकल्प असल्याचं गडकरींनी (Nitin Gadkari) म्हटलंय.