उज्‍जीवन स्‍मॉल फायनान्‍स बँकेकडून काही मुदत ठेवींवर व्‍याजदरांमध्‍ये वाढ

उज्‍जीवन स्‍मॉल फायनान्‍स बँकेकडून काही मुदत ठेवींवर व्‍याजदरांमध्‍ये वाढ करण्यात आली असून ५ नोव्‍हेंबर २०२२ पासून लागू झालेले नवीन व्‍याजदर आकरण्यात येत आहेत.

  • ज्‍येष्‍ठ नागरिकांना देणार जवळपास ८ टक्‍के व ८.७५ टक्‍के व्‍याज

उज्‍जीवन एसएफबीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी इतिरा डेव्हिस म्‍हणाले, “एफडी व्‍याजदरातील वाढ ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने देण्याच्या आमच्या कटिबद्धतेला अधिक प्रबळ करते. हे ग्रॅन्‍युलर ठेवींच्या आमच्या किरकोळ धोरणाशी आणि विकसित होत असलेल्या मॅक्रो-इकॉनॉमिक परिस्थितीशी सुसंगत आहे.”

५ नोव्‍हेंबर २०२२ पासून लागू झालेले नवीन व्‍याजदर

अनु. क्र. मुदत सध्‍याचा व्‍याजदर सुधारित व्‍याजदर
८० आठवडे (५६० दिवस) ७.२० टक्‍के ८.०० टक्‍के
९९० दिवस ७.५० टक्‍के ७.७५ टक्‍के
१२ महिने १ दिवस ते ५५९ दिवस ७.२० टक्‍के ७.५० टक्‍के
५६१ दिवस ते ९८९ दिवस ७.०० टक्‍के ७.५० टक्‍के
९९१ दिवस ते ६० महिने ७.०० टक्‍के ७.२० टक्‍के
६० महिने १ दिवस ते १२० महिने ६.०० टक्‍के ६.५० टक्‍के

 

ग्राहक प्‍लानअंतर्गत किमान १५ लाख रूपयांपेक्षा अधिक ते २ कोटी रूपयांपेक्षा कमीपर्यंत गुंतवणूक करू शकतात. प्लॅटिना एफडी नॉन-कॉलेबल आहे, म्हणजेच या योजनेत आंशिक आणि मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध नाही.

उज्जीवन एसएफबी मासिक, त्रैमासिक आणि मॅच्‍युरिटी व्याज पे-आऊट पर्याय देते. टॅक्स सेव्हर मुदत ठेवी पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह येतात.

एफडींवरील वाढीव दरांची नवीनतम फेरी उज्जीवन एसएफबीला मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर देणार्‍या बँकांमध्ये स्थान देते.

ठळक वैशिष्‍ट्ये:

  • नियमित ग्राहकांसाठी सर्वोच्‍च व्‍याजदर ८० आठवड्यांसाठी (५६० दिवस) ८ टक्‍के असेल
  • ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी सर्वोच्‍च व्‍याजदर ८० आठवड्यांसाठी (५६० दिवस) ८.७५ टक्‍के असेल
  • प्‍लॅटिना एफडीवर अतिरिक्‍त ०.२० टक्‍के व्‍याजदर मिळेल. हे १५ लाख रूपयांपेक्षा अधिक आणि २ कोटी रूपयांपेक्षा कमी ठेवींसाठी लागू आहे.