Indian rupee depreciates sharply against dollar

विदेशी बाजारात अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोमवारी भारतीय चलनाची मोठी पडझड झाली. सोमवारी भारतीय रुपया 56 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरची तुलनेत 77.46 वर आला आहे. ही आत्तापर्यंतची भारतीय चलनाची सर्वांत मोठी घसरण आहे. या घसरणीमुळे महागाई आणखी पेटणार असून सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान, रुपयाच्या घसरणीमुळे विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे(Indian rupee depreciates sharply against dollar).

    दिल्ली : विदेशी बाजारात अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोमवारी भारतीय चलनाची मोठी पडझड झाली. सोमवारी भारतीय रुपया 56 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरची तुलनेत 77.46 वर आला आहे. ही आत्तापर्यंतची भारतीय चलनाची सर्वांत मोठी घसरण आहे. या घसरणीमुळे महागाई आणखी पेटणार असून सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान, रुपयाच्या घसरणीमुळे विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे(Indian rupee depreciates sharply against dollar).

    परकीय चलन बाजारात सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 77.17 वर उघडला होता आणि नंतर 77.46 पर्यंत घसरला, मागील बंद किंमतीच्या तुलनेत 56 पैशांची घसरण झाली आहे. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा 55 पैशांनी घसरून 76.90 वर बंद झाला. चलनवाढीच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार जोखीम पत्करत नसल्याचे विदेशी चलन व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा निर्देशांक 0.35 टक्क्यांनी वाढून 104.02 वर पोहोचला आहे.

    काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी भारतीय रुपयाच्या घसरणीवर पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांचे वय बघितले तर त्यांचे वय 71 वर्षे आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या वयापेक्षा डॉलर 6 वर्षे पुढे गेला आहे. 2014 मध्ये मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी 1 डॉलरची किंमत 58.57 रुपये होती, असे बीवी म्हणाले.

    काँग्रेसने रुपयाच्या घसरणीवरुन केंद्र सरकावर टीका करताना सरकारचे धोरण लकवा, धार्मिक संघर्ष आणि भ्रष्टाचारामुळे हा पैसा आयसीयूमध्ये गेला असल्याचा आरोप केला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर गेला आहे.

    काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, चूबाजूला महागाईचा हाहाकार आहे आणि लोकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. देशात गुंतवणूक येत नाही, उलट परत गेली आहे. देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यातील घसरणीमुळेही रुपयाचे मूल्य घसरले आहे. जेव्हा अशांतता असेल, भ्रष्टाचार असेल, धोरण लकवा असेल, तेव्हा रुपया कमजोर होईल.