भारतीयांसाठी खुशखबर! आता IPHONE सुद्धा ‘मेड इन इंडिया’

भारत आणि चीनमधील तणाव आणि भारत-चीन सीमेवरील होणारा तेढ हा संपूर्ण जगापासून लपून राहिलेला नाही. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर भारत उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे.

    IPHONE सुद्धा ‘मेड इन इंडिया’ : भारतीयांसाठी खुशखबर : कोरोना आणि त्यानंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे चीनची अर्थव्यवस्था अतिशय वाईट परिस्थिती आलेली आहे. मोबाईल फोन आणि तंत्रज्ञान यांचं मोठं हब म्हणून चीनची ओळख जगभरात आहे. यामुळे चीनला मोठा झटका बसला आहे. भारत आणि चीनमधील तणाव आणि भारत-चीन सीमेवरील होणारा तेढ हा संपूर्ण जगापासून लपून राहिलेला नाही. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर भारत उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. आणि त्याच दृष्टीने भारताला आता आणखी एक यश आपल्या पदरात पाडून घेण्यात आलेलं आहे. कारण आता जगभरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय असणाऱ्या आयफोनची निर्मिती आता भारतात होणार आहे. ‘मेड इन इंडिया’ (Made in India) आयफोन आता भारतात बनवण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाकडून आयफोनचे हे काम पूर्ण केले जाणार आहे.

    टाटाने अॅपल फोनचा पुरवठादार असणाऱ्या विस्ट्रॉनचा कारखाना विकत घेतला आहे, ही कंपनी तैवानची असून टाटा येत्या अडीच वर्षांत इथे आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. टाटा समूहाची एक कंपनी असलेली टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (TEPL) ने विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कडून $ १२५ दशलक्ष म्हणजे सुमारे १००० कोटी रुपयांना विकत घेतली आहे, या कराराची चर्चा दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून चालू होती, त्यानंतर टाटा समूहाने विस्ट्रॉनचा कारखाना घेण्याच्या कराराला मान्यता दिली. इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती देताना टाटा समूहाचे अभिनंदन केले आहे. या करारानंतर टाटा समूह अडीच वर्षांत देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी आयफोन भारतात तयार करणार आहे.

    विस्ट्रॉनने २००८ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला, त्यानंतर ७ वर्षानंतर म्हणजेच २०१७ मध्ये कंपनीने अॅपलसाठी आयफोनचे उत्पादन सुरू केले. या प्लांटमध्ये आयफोन-१४ मॉडेलची निर्मिती करण्यात आली आहे. १०,००० हून अधिक कामगारांसह हा प्लांट ताब्यात घेऊन टाटांनी मोठे यश मिळवण्यात आलेलं आहे, त्यामुळे विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडेल. त्यासोबतच विस्ट्रॉन व्यतिरिक्त फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन देखील भारतात आयफोन उत्पादनात मदत करतील.